wardha news, sp nurul hasan  saam tv
महाराष्ट्र

Wardha News : आरएसएस जिल्हा संघचालक मारहाणप्रकरणी पाच युवक अटकेत, एकाचा शाेध सुरु : एसपी नुरुल हसन

या घटनेच्या निषेर्धात हिंगणघाट येथे बंद पुकारण्यात आला हाेता.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : आरएसएसच्या जिल्हा संघचालकांना मारहाण केल्याप्रकरणी पाच संशयितांना पाेलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एकाचा शोध सुरु असल्याची माहिती वर्ध्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन (sp nurul hasan) यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पाेलिसांच्या आवाहनास प्रतिसाद देत हिंगणघाट शहरातील नागरिकांनी संयम ठेऊन शांतता ठेवली याबद्दल नागरिकांचे पोलीस प्रशासनाने आभार मानले. (Maharashtra News)

हिंगणघाट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत (jethanand rajput) यांना काही युवकांनी बस मधून उतरवून मारहाण केली होती. पोलिसांनी शोधकार्य करीत बारा तासांत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. एकूण सहा संशयित आरोपी निष्पन्न झाले असून एकास लवकरच अटक करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी नमूद केले.

जिल्हा संघचालकांवरील हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत घटनेच्या दिवशी पोलिसांनी रात्रीच एकाला अटक केली होती. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी गोपनीय माहिती घेत आणखी चौघांना अटक केली. आता याप्रकरणात अटकेतील संशयित आरोपींची संख्या एकूण पाच झाली आहे.

संशयितांपैकी पाेलिसांनी एकाला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने एक दिवसीय पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली तसेच एकाचा शोध सुरु असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार चालढकल करतेय; माणिकराव ठाकरे यांचा आरोप

Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा १ कोटी रुपयांचा निधी

Wednesday Horoscope: देवीच्या कृपेने आर्थिक बाजू सुधारण्यासह जीवनातील अडचणी दूर होतील; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य

Bhayandar Tourism : वीकेंडचा प्लान ठरला; भाईंदरमध्ये लपलाय सुंदर किनारा, पाहताच मनाला भुरळ पडेल

SCROLL FOR NEXT