घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; चोरट्यांकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त  
महाराष्ट्र

घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; चोरट्यांकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

ग्रामीण भागात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या टोळीला अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

अरुण जोशी

अमरावती: दिवसा वेगळा धंदा करुन घरावरती पाळत ठेवून रात्री त्यांच घरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीच्या अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेले चोर हे अट्टल गुन्हेगार असून चोऱ्या करण्यात सराईत होते. आजपर्यंत त्यांनी अनेक चोऱ्या केल्या असून त्यांच्याडून ६ लाखांच्या मुद्देमालासह अनेक चोरीचा मालसुध्दा हस्तगत करण्यात आला आहे.Police arrest gang of thieves

ग्रामीण भागात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या टोळीला अमरावती ग्रामीण पोलिसांच्याAmravati Rural Police स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमध्ये चार अट्टल चोरट्याना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड झाले आहेत.

शेतातील तारा कापून घरफोडी करण्याचे गुन्हे या टोळीवर दाखल होते. ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी झाल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना मिळत होत्या. त्या अनुषंगाने तपास करीत असता आज पहाटेच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून चार अट्टल चोरटयांना अटकArrest केली. आरोपी हे दिवसा फडे विकण्याचे काम करीत आणि रात्रीच्या सुमारास घरफोड्या करीत अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.

आरोपींच्या ताब्यातुन सोन्याचे दागीने १४० ग्रॅम किंमत ५ लाख ८० हजार चांदीचे दागीने ५५.६२ ग्रॅम किंमत १७ हजार व चोरी करताना वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. तसेच याच्या आधी केलेल्या अनेक गुन्हांची कबुलीहीConfession या चोरट्यांनी दिली आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: उकळते दूध वारंवार उतू जाणे हे कशाचे लक्षण आहे?

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

SCROLL FOR NEXT