Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या महासंवाद बैठकीला परवानगी नाहीच; आयोजकांना पोलिसांकडून नोटीस

Maratha Aarakshan : 20 मार्च रोजी बीडच्या परळी वैजनाथ येथे अशाच महासंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारलीये. तसेच आयोजकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

विनोद जिरे

Beed News :

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा सरकार विरुद्धचा लढा सुरूच आहे. याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाकडून गावागावात महासंवाद बैठकीचे आयोजन केले जात आहे. येत्या 20 मार्च रोजी बीडच्या परळी वैजनाथ येथे अशाच महासंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारलीये. तसेच आयोजकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे आणि मेळाव्यांचा आयोजनावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याच आदेशाचा दाखला देत पोलीस प्रशासनाने महासंवाद बैठकीला परवानगी नाकारली आहे.

ही बैठक मोंढा मार्केट, हनुमान मंदिरासमोरील मैदानात होणार असून यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या परवानगीच्या आधारे आयोजकांनी परळी शहर पोलीस ठाण्यात 13 मार्च रोजी महासंवाद बैठकीच्या परवानगीसाठी अर्ज केला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार आयोजकांनी जातीचा उल्लेख टाळत पुन्हा काल परळी पोलीस प्रशासनाला नवीन अर्ज देत या बैठकीसाठी परवानगी मागितली आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेश आणि लोकसभेची आचारसंहिता यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या महासंवाद बैठकीला अद्याप परवानगी दिली नाहीये. मात्र ही महासंवाद बैठक घेण्यासाठी मराठा आंदोलक ठाम असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै - ऑगस्टचे ३,००० रुपये खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी ई-केवाईसीवर दिली मोठी अपडेट

Sugar Substitutes: साखरेच्या जागी आजचं खाण्यास सुरुवात करा हे 5 पदार्थ; वजन आणि शुगर दोन्ही राहील कंट्रोलमध्ये

EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

Kareena Kapoor : "पागल करते हो तुम लोग"; तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपूर खाननं सोडलं मौन, VIDEO समोर

Low blood pressure: अचानक BP लो झालाय? डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी करा हे 5 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT