परभणी : मराठवाड्यात कापसाचे पीक हे बोडात आले असून शेतकरी कापसाच्या पिकांवर अनेक प्रकारची औषध फवारणी करत आहेत. किटकनाशक तसेच अन्य महागडी आणि घातक औषध फवारणी करत असताना हवी ती खबरदारी शेतकरी घेत नाहीत त्यामुळे हि औषध फवारणी शेतकऱ्यांच्या जीवावरती बेतत आहे.Poisoning of six farmers while spraying drugs in Parbhani district
हे देखील पहा-
सध्याचा काळ हा औषध फवारणी ची कामे करण्यासाठी योग्य असल्यामुळे शेतकऱी औषध फवारणीची घाई करत आहेत मात्र ती फवारणी करताना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा घेत नसल्याच समोर येत आहे औषध फवारताना मास्कचाही वापर करत नसल्याने हि औषध फवारणी त्याच्या जीवावर बेतत आहे.
कापसाला बोंड येण्यास सुरुवात झाली असून खरीप पिंकांतील प्रमुख पीक कापूस सोयाबीन व इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून शेतकरी किटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत पण ही फवारणी करताना तोंडाला मास्क किंवा किट न घालता फवारणी करत आहेत जिल्हातील विविध ठिकाणी सहा जनाना फवारणी करताना विषबाधा झाली असून जिल्हा रुग्णालयात त्याच्या वर उपचार सुरू आहेत.
WHO च्या माहिती प्रमाणे दरवर्षी ३ मिलियन लोकांना आरगणो फ़ॉसफोरस ची विषबाधा होते. जे बाहेरच्या देशांनी प्रतिबंध केलेले ओषधी आपल्या देशात त्याचा सर्रास वापर सुरु आहे ह्या ओषधीचा सर्वात जास्त वापर हा शेती वर व ग्रामीण भागात होत असतो वापर करताना कसल्याही प्रकारची सुरक्षासाधने वापरत नसल्याने विषबाधा होते. विदर्भात 2017ला अनेकांना ह्या फवारणीने आपले प्राण गमवावे लागले होते.अश्या घातक ओषधी बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई मागणी जोर पकडू लागली असून कारवाई झाल्यास अनेक शेतकरी व मजुरांचे प्राण वाचतील हे मात्र नक्की.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.