PM Narendra Modi news  Saam tv
महाराष्ट्र

PM Narendra Modi : आजारातून लवकर बरे व्हा; संजय राऊतांची प्रकृती गंभीर, PM नरेंद्र मोदींकडून खास पोस्ट

PM Narendra Modi on Sanjay Raut : संजय राऊतांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांसाठी पीएम नरेंद्र मोदींनी खास पोस्ट केली आहे.

Vishal Gangurde

 संजय राऊत गंभीर आजारामुळे दोन महिने राजकारणापासून दूर राहणार

संजय राऊतांनी पत्रातून प्रकृतीबद्दल माहिती दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून बरे होण्यासाठी प्रार्थना केली

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकृतीचं कारण देऊन २ महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. संजय राऊत यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. संजय राऊतांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्यासाठी पोस्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संजय राऊत यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. 'आपण लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टनंतर संजय राऊत यांनीही त्यांचे आभार मानले आहेत. संजय राऊत म्हणाले, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. माझं कुटुंब त्यांचे आभारी आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र!'.

संजय राऊतांनी पत्रात नेमकं म्हटलं काय?

संजय राऊतांनी पत्रात म्हटलं की, 'आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि भरभरून प्रेम दिलंय. मात्र, अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे माझ्यावर उपचार सुरू आहेत. मी लवकरच आजारातून बरा होईन'.

'वैद्यकीय सल्ल्यानुसार, मला बाहेर जाणे किंवा गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आलंय. या गोष्टीला नाईलाज असून मला खात्री आहे मी लवकर ठणठणीत बरा होईल. नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या भेटीस येईन', असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी पत्रातून काय सांगितलं?

 संजय राऊत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन महिने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय प्रतिक्रिया दिली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'लवकर बरे व्हा अशी प्रार्थना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airtel Cheapest Plan: घरात Wifi आहे? मग 'हा' एअरटेल प्लॅन तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Election : इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय, निवडणुकीत उतरण्याआधी हे वाचाच...

Success Story: वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IPS; सृष्टी मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

LPG Cylinder Price :एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, तुमच्या शहरात दर किती? वाचा

SCROLL FOR NEXT