PM Modi visit to Solapur, Maharashtra SAAM TV
महाराष्ट्र

PM Modi to Visit Solapur : PM नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर; कडेकोट सुरक्षा, ६ हेलिपॅड, कशी सुरुये तयारी?

PM Modi in Maharashtra : भारतातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असणाऱ्या रे नगरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उद्या, शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.

विश्वभूषण लिमये

PM Narendra Modi Will visit Maharashtra On 19 January :

भारतातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असणाऱ्या रे नगरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उद्या, शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. रे नगर परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. (Latest News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यासाठी रंगीत तालीम सुद्धा प्रशासनाकडून केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. रे नगर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर झळकू लागले आहेत. तर रस्त्याच्या कडेला आतापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे झेंडे लागले आहेत.

सहा सुसज्ज हेलिपॅड तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची जय्यत तयारी सोलापूरच्या रे नगर परिसरामध्ये दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष हेलिपॅडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यपाल यांच्यासाठी सुद्धा हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

एकूण सहा हेलिपॅडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हेलिपॅड परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT