Sharad Pawar On Modi Government Saam Tv
महाराष्ट्र

Saamana Editorial News: दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा... पवार- मोदींच्या भेटीवर सामनातून टीकास्त्र

PM Modi Pune visit 2023: पुण्यातील पुरस्कार सोहळ्यात पवार- मोदी एकाच मंचावर येणार असल्याने ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

PM Narendra Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

एकीकडे भाजपविरोधी पक्षांची मोट बांधली जात असतानाच पवार- मोदी एकाच मंचावर येणार असल्याने ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख...

टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे पुण्यात (Pune) येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भव्य मंडप, पायघडय़ा वगैरे घातल्या आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यात आपले पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन विधिवत पूजाअर्चा, अभिषेक, आरती वगैरे करणार आहेत.

हे सर्व ते करतील याबाबत कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण पुरस्कार सोहळय़ात श्रीमान शरद पवार (Sharad Pawar) हे खास व्यासपीठावर उपस्थित राहतील व शरद पवारांच्या हस्ते परहस्ते मोदींना पुरस्कार, टिळक पगडी देऊन सन्मानित केले जाईल. वादाची ठिणगी इथे पडली आहे.

महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व लगेच त्यांचा पक्ष फोडला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार हे पुण्यातील आजच्या कार्यक्रमास हजर राहून मोदींचे आगत स्वागत करणार हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही. खरे तर लोकांच्या मनात आपल्या विषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती.

आता शरद पवारांचे म्हणणे असे की, तिनेक महिन्यांपूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल; पण पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा पक्ष फोडून भाजपमध्ये सामावून घेतला. त्याचा निषेध म्हणून शरद पवार हे गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart-Morning Walk : सकाळी दाट धुक्यात मॉर्निंग वॉक केल्याने हृदयविकारांचा धोका? चालण्यापूर्वी वाचा योग्य वेळ कोणती

Paneer Biryani Recipe: घरी बनवा हॉटेलसारखी चविष्ट आणि मसालेदार पनीर बिर्याणी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अतिक्रमणानंतर पुणे महापालिका आयुक्तांचा मोर्चा अनधिकृत फ्लेक्सवर

Milk Storage Tips: दूध फ्रिजमध्ये ठेवूनही लवकर खराब होतंय? फ्रिजमधील 'ही' जागा ठरू शकते कारण; नेमकं कुठे ठेवावं दूध?

Jacket Blouse Designs : थंडीतही दिसा स्टायलिश! साडीसोबत ट्राय करा जॅकेट स्टाइल ब्लाऊजच्या 'या' ६ डिझाइन्स

SCROLL FOR NEXT