Sharad Pawar Speech Dahiwadi Sabha: Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar: महाराष्ट्रातील नोक-या कुणी पळवल्या? पंतप्रधान मोदींनी टाटांचा प्रकल्प गुतरातला नेला, शरद पवारांचा आरोप

Sharad Pawar: नागपूरमधून टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला कसा गेला याबाबत पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

Snehil Shivaji

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा प्रकल्प गुजरातला कसा नेला याचा किस्साच पवारांनी सांगितलाय. मात्र यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या कंपन्यांचा मुद्या पेटणार आहे. पवारांचा गौप्यस्फोट काय आणि त्यावर फडणवीसांनी काय उत्तर दिलं यावरचा हा विशेष रिपोर्ट.

केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याचा विरोधकांनी आरोप अनेकदा केला. आता निवडणूकांच्या तोंडावर शरद पवारांनी तर मोदींनी गुजरातमध्ये उद्घाटन केलेल्या टाटा एअरबस प्रकल्पावरुन मोठा गौप्यस्फोट केला. पवारांनी केलेल्या आरोपांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकांमध्ये राज्यातून पळवलेल्या प्रकल्पांवर मोठी खंडाजंगी होईल असं दिसतंय. पवारांनी मोदींवर नागपूरच्या प्रकल्पावरून काय आरोप केले ते पाहूयात.

पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर महायुतीच्या काळात उद्योग क्षेत्रात एक नंबरवर असलेला महाराष्ट्र पाचव्या स्थानावर घसरल्याचंही सांगितलं. त्यामुळे निवडणुकीत पुन्हा एकदा परकीय गुंतवणूक आणि उद्योगधंद्यांचा मुद्दा गाजणार असल्याचं दिसतंय. मात्र फडणवीसांनी शरद पवारांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते काय म्हटले आहेत पाहूयात. या वयात इतके खोटे बोलायचे नसते. काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी. गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात, कधी कर्नाटक नंबर 1 वर होते. महाराष्ट्र 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत.

महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून अनेक प्रकल्प परराज्यात गेले हे सत्य आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस , सॅफ्रन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क यासारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे राज्यात येणारे हजारो रोजगार आज महाराष्ट्रातील तरुणांकडून हिरावले गेले. त्यामुळे यंदा ज्यांच्या चुकांमुळे हे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले त्यांना जनता बेरोजगार करेल की यावरुनही राजकारणच होईल हे येणाऱ्या काळातच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Maharashtra Exit Poll : विक्रोळी मतदारसंघात सुनील राऊत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

SCROLL FOR NEXT