PM MODI LIFTED 25 CRORE PEOPLE OUT OF POVERTY IN 10 YEARS SAYS CM FADNAVIS saam tv
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं: मुख्यमंत्री फडणवीस

CM Devendra Fadnavis : सरकारच्या कल्याणकारी कार्यक्रमांमुळे गेल्या दशकात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले. पंतप्रधान मोदींनी अर्थव्यस्थेत मोठा बदल घडवला असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदी सरकारचं कौतुक केलं.

  • २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचा दावा.

  • “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” कार्यक्रमात वक्तव्य.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात जे लोक गरिबी आणि दारिद्रयरेषेखाली होते, ते गरिबी रेषेच्या वर आले. हे दहा वर्षात करणं जगातल्या कुठल्याही देशाला संभव झालं नाही, ते मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्यामुळे झालं, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या 12 वर्षांतील महत्त्वपूर्ण निर्णय आणि कारकीर्द उलगडणाऱ्या पुस्तकाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामांचे गौरवोद्गार काढले.

भारताची अर्थव्यवस्थेतील प्रगती थक्क करणारी - फडणवीस

देशातील 25 कोटी लोक जे गरिबी आणि अती दारिद्रयरेषेखाली होते, तीव्र गरिबीमध्ये होते ते गरिबीच्या रेषेवरती आले. हे १० वर्षात करणं जगातल्या कोणत्याच देशाला संभव झालं नाही, ते मोदींच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्याने करून दाखवलं. विविध क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाचा पाया रचला आहे, त्यामुळे गरिबी दूर झाली आहे.

आता याच्यापुढे सातत्य त्याच्यावरच्या इमारतीवर मजले चढू प्रगती होणार आहे. इतका भक्कम पाया पंतप्रधान मोदींना रचलेला आहे. यामुळे आता पाठीमागे जाण्याचं काहीच कारण नाही, कारण आज आपण अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती ही थक्क करणारी बनली आहे.

देशाच्या अर्थकारणात मोठा बदल घडवला

पंतप्रधा नरेंद्र मोदींनी अर्थकारणात मोठा बदल घडवला असल्याचं म्हणत मुख्यमंत्री काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या भारताचा जीडीपी 2013- 14 साली 103 लाख कोटी होता, आज तो जीडीपी 3, 57 लाख कोटीपर्यंत पोहोचलाय. गेल्या दहा वर्षांमध्ये यात तीन पटीने वाढ झाली आहे.

यात महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर साधारणपणे 13-14 साली राज्याचा जीडीपी 13 लाख कोटीचा होता, तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. मला असं वाटतं की ही जी काही एकप्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आहे, मोदीजींनी एक महत्त्वाचा शिफ्ट देशाच्या अर्थकारणात आणला.

यूपीएच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही लोकांकरिता योजना तयार करू. जे काही आहे ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊ. त्याच्यावर लोकांनी जगलं पाहिजे आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही. आम्ही देशाच्या विकासावर देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही, लोकांना आपल्यावर अवलंबित करून ठेवू अशा प्रकारच्या मानसिकतेतून ज्याला डोल्सची इकॉनॉमी म्हणतो. अशा प्रकारची अर्थव्यवस्था अनुदानित अनुदान प्रणित अर्थव्यवस्था ही त्या काळामध्ये तयार झाली होती असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत पेट्रोल पंप चालकांडून पंपावर पोलिस बंदोबस्ताची मागणी

लव्ह मॅरेजचा भयानक शेवट! नवऱ्याने 50 वार करून बायकोला भर रस्त्यात निर्घृणपणे संपवलं, सोलापूर हादरलं

Accident: विठुरायाच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला, भरधाव कारला अपघात; २ भाविकांचा जागीच मृत्यू

Tuesday Horoscope: मनाप्रमाणे दिवस जाईल, 5 राशींची चांदीच चांदी होणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Mango Pickle Recipe : १०-१५ मिनिटांत चटपटीत लोणचे तयार; वर्षभर टिकेल चांगले, न विसरता टाका 'हा' पदार्थ

SCROLL FOR NEXT