PM Narendra Modi Saam Tv
महाराष्ट्र

PM Modi in Sindhudurg: PM मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

PM Modi News: छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारी सामर्थ्याच्या बळावर शत्रूला नामोहरम केले आणि त्यासाठी किल्ले सिंधदुर्ग सारखे अभेद्य गडकिल्ले निर्माण केले. त्या सिंधुदुर्गच्या साक्षीने आज नौदल दिन साजरा होत आहे.

Ruchika Jadhav

Sindhudurg:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (4 डिसेंबर) नौदल दिनानिमित्त महाराष्ट्रात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्यावेळी ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर देखील भेट देणार आहेत. तसेच दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण देखील करतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी मोदी तारकर्ली येथील नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारी सामर्थ्याच्या बळावर शत्रूला नामोहरम केले आणि त्यासाठी किल्ले सिंधदुर्ग सारखे अभेद्य गडकिल्ले निर्माण केले. त्या सिंधुदुर्गच्या साक्षीने आज नौदल दिन साजरा होत आहे.

शिवरायांनी १६६४ मध्ये सिंधदुर्ग किल्ल्याची उभारणी केली. याच ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गला आज भारतीय नौदलाची सलामी मिळणार आहे. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मान्यवर उपस्थित राहणारे आहेत.

सायंकाळी ६ वाजता मुख्य सोहळा सुरू होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण मालवण शहर गजबजले तसेच सजले आहे. मोदींच्या दौऱ्याची उत्सुकता संपूर्ण कोकणातील नागरिकांना लागून राहीली आहे. मोदी येणार असल्याने किल्ले परिसरात पोलिसांचाही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rules: 'कुलमुखत्यारपत्र' म्हणजे काय रं तात्या? जमीन,मालमत्तेच्या व्यवहारात कसा होतो फायदा?

Vitthal Rukmini : विठुरायाला दोन किलो चांदीचा मुकुट; जालना येथील भाविकाकडून मुकुट अर्पण

Maharashtra Rain Live News: खडकवासला धरण साखळीत ९१.९४ टक्के पाणीसाठा

Kalyan Rain : कल्याणला पावसाचा तडाखा, पोलीस ठाण्यात घुसलं पाणी | VIDEO

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

SCROLL FOR NEXT