PM Modi : कोलकाता, बदलापूरसह अनेक राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. संपूर्ण देशभरात संतप्त वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देशातील महिला अत्याचार प्रकरणावर वक्तव्य केलेय. जळगाव येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, महिलांवरील गुन्हे माफीला पात्र नाहीत. कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा केल्यास कारवाई झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात ई-एफआयआर आणि कठोर कायद्यांवर भर दिला. त्याशिवाय राज्य सरकारांना केंद्राकडून मदत करण्याचे आश्वासन दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात काय म्हणाले?
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे, यासाठी भारतीय न्याय संहिते अंतर्गत कायद्याचा वापर केला जाईल.
महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.
महिलांचे सामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी आवश्यक ती मदतही प्रत्येक राज्यांना केली जाईल, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत राहील.
महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. रोजगार आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष येथे असते. त्यामुळे या प्रयत्नांसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कायदा आणखी कडक करत आहे.
आधी वेळेवर एफआयआर दाखल होत नसल्याच्या तक्रारी होत्या. हे खटले खूप वेळ घेतात. भारतीय न्यायिक संहितेतील असे अनेक अडथळे आम्ही दूर केले आहेत. यामध्ये महिला आणि बालकांवरील अत्याचारांबाबत एक संपूर्ण प्रकरण तयार करण्यात आले आहे. आता पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जायचे नसेल तर त्या घरी बसून ई-एफआयआर दाखल करू शकतात. पोलीस स्टेशन स्तरावर कोणीही ई-एफआयआरमध्ये दिरंगाई करू शकणार नाही.
नव्या कायद्यांमध्ये अल्पवयीन मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी मृत्युदंड आणि जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे.
मुलींसोबत लग्नाच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी यासाठी कोणताही स्पष्ट कायदा नव्हता. आता, खोटी आश्वासने आणि लग्नातील फसवणूक देखील भारतीय न्यायिक संहितेत स्पष्टपणे परिभाषित केली गेली आहेत.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सोबत आहे. लोकांची पापी मानसिकता समाजातून नष्ट करायची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.