Saam Tv
तुम्ही उन्हाळ्यात कैरीची भाजी करता त्याचप्रमाणे तुम्ही हिवाळ्यात पेरुची भाजी तयार करु शकता.
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असते, त्यामुळे डोळ्यांची प्रकाश क्षमता वाढते. तसेच पेरुमुळे पचनसंस्था सुधारते.
1 कप पेरु (हिरवा) ,1/2 कप टोमॅटो प्युरी ,1/4 चमचा जीरे, 1/4 चमचा धणे, 1/4 चमचा मोहरी, 1/4 चमचा हळद, 1/4 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा लिंबाचा रस, कढीपत्ता, ,1/4 चमचा भाजलेलं खोबरं, मीठ, तेल
पेरू धुवून त्याचे बारीक काप करा. आता फोडणी द्यायला सुरुवात करा.
एका कढईत तेल गरम करा त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, भाजलेलं खोबरं अॅड करा. दोन मिनिटांनी टोमॅटो प्युरी अॅड करुन मिसळून घ्या.
आता टोमॅटो छान शिजल्यावर त्यात पेरु अॅड करा आणि आवश्यकतेनुसार पाणी अॅड करा. पेरु मऊ झाल्यावर लिंबाचा रस अॅड करा. गरमा गरम पेरुची भाजी सर्व्ह करा.
पीठ कमी तेलात फ्राय करा. पेरूच्या जागी इतर भाज्या देखील वापरू शकतात. या रेसिपीचा आनंद घ्या आणि आरोग्यदायी नाश्ता करा!
NEXT: तुळशीचे रोप हिवाळ्यात सुकत असेल तर करा 'या' 5 टिप्स फॉलो