सुधागडमधील खेळाडूंना मिळाले हक्काचे क्रीडासंकुल दिनेश पिसाट
महाराष्ट्र

सुधागडमधील खेळाडूंना मिळाले हक्काचे क्रीडासंकुल

मागील अनेक वर्षांपासून बंद असणारे व उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले क्रीडा संकुल आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिनेश पिसाट

रायगड - पालीतील (Pali) भव्य क्रीडा संकुलाचे (Sport Complex) उद्घाटन पालकमंत्री (Guardian Minister) आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. मागील अनेक वर्षांपासून बंद असणारे व उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले क्रीडा संकुल आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे. त्यामुळे पाली व सुधागड (Sudhagad) परिसरातील उदयोन्मुख खेळाडू व क्रीडाप्रेमींना याचा लाभ होणार असून त्यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे. Players from Sudhagad got the sports complex

हे देखील पहा -

या क्रीडा संकुलाच्या उदघाटनाप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना बॅडमिंटन खेळण्याचा मोह आवरला नाही. तसेच या क्रीडासंकुलाच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे. निसर्ग व तौक्ते चक्री वादळाने क्रीडा संकुल इमारतीचे व आसपासच्या मोठ्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले होते, अशातच मुदत देऊन जलदगतीने या इमारत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे व वृक्षारोपण करण्यात आले.

भविष्यात या इमारतीत शासन नियमावलीच्या अधीन राहून काही कार्यक्रम घेण्यास परवानगी मिळाल्यास अधिक उपयुक्त राहील असे मत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. तर तालुका क्रीडा संकुलाचे उदघाटन पार पडल्यानंतर येथील खेळाडूंना कोरोना नियमांचे पालन करून सरावासाठी संकुल उपलब्ध व्हावे असेही तटकरे यांनी सूचित केले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT