Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Crime: हिंजवडीत खळबळ! २० वर्षांच्या मुलाला लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टला बाम चोळलं, व्हिडीओ केला व्हायरल

Pimpri Chinchwad News : राम तुळशीराम गंभीरे याने तक्रारदार तरुणाच्या हातात सिगरेट दिली. मात्र सिगरेट तक्रारदार तरुणाच्या हातातून खाली पडली. त्यानंतर तक्रारदार तरुणाने राम गंभीरेला सिगरेट उचलून दिली.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील आयटीसीटी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. यात एका वीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर त्याच्या गुप्तांगाला बाम लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मारुंजी येथील पनाची सोसायटी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर तरुण हा पनाची सोसायटी या ठिकाणी आपल्या मित्राच्या फ्लॅटमध्ये भेटायला गेला होता. त्या दरम्यान राम तुळशीराम गंभीरे याने तक्रारदार तरुणाच्या हातात सिगरेट दिली. मात्र सिगरेट तक्रारदार तरुणाच्या हातातून खाली पडली. त्यानंतर तक्रारदार तरुणाने राम गंभीरेला सिगरेट उचलून दिली. 

सिगरेट उचलून देण्याचा राग 

सिगरेट उचलून दिल्याचा राम गंभीरे याला तरुणाचा अतिशय राग आला. यावरून त्याने तू माझी बरोबरी करतो का? असं म्हणत राम गंभीरे यांनी तक्रारदार तरुणाला लाथा- बुक्क्याने तसेच त्याच्या हातातील धातूच्या कड्याने बेदम मारहाण करण्यास सुरू केली. त्यानंतर त्याच्या गुप्तांगाला बाम लावून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बनवून प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. 

तीन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

सदरच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंजवडी पोलिसांनी राम तुळशीराम गंभीरे याच्यासह त्याला मदत करणारे श्रेयस संजय कवडे आणि ललित प्रमोद भदाणे या तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT