Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : शरद पवार गटाकडून पक्ष संपविण्याचा कट; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आरोप

Pimpri Chinchwad News : महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पिंपरी - चिंचवड शहरात एकही जागा सुटलेली नाही.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीत तिची वाटपावरून मित्र पक्षांमध्ये विघडी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला संपवण्याचा कट करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अँड सचिन भोसले यांनी केला आहे.

महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पिंपरी - चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad) एकही जागा सुटलेली नाही. यामुळे शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी नाराज आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये जागा न मिळाल्याने संतापलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिकांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) काम न करण्याचा ठराव आज पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना भवनात मंजूर केला आहे. आम्ही महाविकास आघाडीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन मतदार संघ मागत होतो. या तिन्ही मतदारसंघात आमची मोठी ताकत आहे. मात्र आमची ताकत असताना देखील आम्हाला एकही जागा पिंपरी चिंचवड शहरात मिळाली नाही. याला कारणीभूत फक्त शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे; असा आरोप अँड सचिन भोसले यांनी केला आहे. 

भोसले करणार उमेदवारी 

पिंपरी चिंचवडमध्ये एक देखील जागा न मिळाल्याने शिवसैनिक नाराज आहेत. दरम्यान २९ तारखेला स्वतः पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिकांच्या मदतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार; असा दावा देखील अँड सचिन भोसले यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची फी निश्चित; कोणत्या कोर्ससाठी किती शुल्क? घ्या जाणून

ब्रह्म मुहूर्तावर 'या' शब्दांचा जप करणं आहे शुभं, वर्षभर घरी येईल पैसा

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

SCROLL FOR NEXT