Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत जोरदार राडा; बंडखोरीतीळ अर्ज मागे घेण्यासाठी होती बैठक

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहर विधानसभा मतदारसंघात झालेल्या बंडखोरीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गट संपर्कप्रमुख सचिन अहिर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अँड. सचिन भोसले आणि संजोग वाघेरे यांनी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील विधानसभा निवडणूक बंडखोरी टाळण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मतदारसंघात झालेली बंडखोरी मागे घेण्याबाबत चर्चा सुरु होती. यामुळे बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी नाराज पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर विधानसभा मतदारसंघात झालेल्या बंडखोरीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गट संपर्कप्रमुख सचिन अहिर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अँड. सचिन भोसले आणि संजोग वाघेरे यांनी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक एका बँकवेट हॉलमध्ये घेतली होती. या बँकवेट हॉलमध्ये (Bhosari) भोसरी विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक सुरू असताना जोरदार घोषणाबाजी आणि राडा झाला आहे. यामुळे काही वेळ बैठकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

भोसरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे बंडखोर पदाधिकारी रवी लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. तर पिंपरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. आता सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर रवी लांडगे आणि गौतम चाबुकस्वार आपला अर्ज मागे घेऊन बंडखोरी टाळणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेनेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? निवडणूक आयोगाला चूक भोवणार?

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

चीन बनणार ‘गोल्डन हब’? काय आहे चीनचं 'ऑपरेशन गोल्ड' ?

धावत्या एक्स्प्रेसमध्ये घुसला साप! प्रवाशांची पळापळ|VIDEO

Maharashtra News Live Update: Dhule: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

SCROLL FOR NEXT