PCMC News Saam tv
महाराष्ट्र

PCMC News : ऐन दिवाळीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई; कर थकवणाऱ्या २७ मालमत्ता केल्या जप्त

PCMC Seizes 27 Properties: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनेकदा थकबाकीदार कडून कर भरणाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील हा थकबाकीदारांनी कराचा भरणा केला नसल्याने अखेर महापालिकेने कारवाईचे पाऊल उचलले.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : शहरातील काही मालमत्ता धारकांनी महापालिकेकडून आकारण्यात येत असलेल्या मालमत्ता कराचा भरणा करण्यात आलेला नाही. त्यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर मालमत्ता कर थकवणाऱ्या नागरिकांविरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई सुरू करत काही मालमत्ता जप्त केल्या आहेत.

आर्थिक वर्षात महापालिकेकडून वेगवेगळ्या कराची आकारणी करत त्याची वसुली करण्यात येत असते. मात्र काही मालमत्ता धारकांकडून कराचा भरणा न करता रक्कम थकीत ठेवली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनेकदा थकबाकीदार मालमत्ता धारकांकडून कर भरणाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील हा थकबाकीदारांनी कराचा भरणा केला नसल्याने अखेर महापालिकेने कारवाईचे पाऊल उचलले आहे. 

२७ जणांच्या मालमत्ता जप्त 

मालमत्ता कर बुडवणाऱ्या शहरातील जवळपास २७ मालमत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेने आतापर्यंत जप्त केल्या आहेत. तसेच काही मालमत्तांवर नोटीसी लावून तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित करून महापालिकेने करबुडव्या नागरिकाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर महापालिकेने कारवाई सुरु केल्याने करबुडव्यांना चांगलाच दणका दिला आहे. 

महापालिकेचे १८ पथक तयार 

मालमत्ता कर वसुलीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने जवळपास १८ पथके तयार केली असून, दिवाळी उत्सवातच थकबाकीदारांकडे वसुलीसाठी पथक रवाना होत आहेत. तर जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी थकवलेलं कर भरून कारवाई टाळावी अस आव्हान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

SCROLL FOR NEXT