IPL Betting Saam tv
महाराष्ट्र

IPL Betting: आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा; धाड टाकून पोलिसांची कारवाई

आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा; धाड टाकून पोलिसांची कारवाई

रोहिदास गाडगे

पिंपरी चिंचवड : आयपीएल क्रिकेट मॅच सुरु असून यावर ऑनलाईन सट्टा (Online Betting) चालविला जात आहे. हा सट्टा घेणाऱ्या टोळीवर (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने धाड टाकून कारवाई आहे. (Live Marathi News)

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत लेक पॅराडाईज सोसायटीतील हाऊस नंबर 44 येथे काही बुकी आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा घेत आहेत. अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाने धाड टाकून रोमी सुरेश नेहलांनी, विनोद राजू सतीजा आणि लखन राजू गुरबानी या तीन आरोपींना अटक केली आहे.

मुद्देमाल जप्त

त्यांच्या ताब्यातून सात मोबाईल फोन, एक लॅपटॉप, पाच वह्या, दोन पेंट असा एकुण 4500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या बुकी विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार आणि पाच व इंडियन टेलिग्राम ऍक्ट कलम 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT