Wakad Police Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : चिमुकल्यासह आईची अकराव्या मजल्यावरून उडी; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना

Pimpri chinchwad News : वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील रिगेला सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना २० एप्रिलला सायंकाळी घडली आहे. कोमल आवटे आणि सोहम आवटे असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकाचे नाव आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : विदेशातून घरी परतलेल्या एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलासह अकराव्या मजल्यावरून उडी मारली. यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. महिलेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून (Police) याबाबत तपास सुरु आहे. (Breaking Marathi News)

वाकड (Wakad) पोलीस स्टेशन हद्दीतील रिगेला सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना २० एप्रिलला सायंकाळी घडली आहे. कोमल आवटे आणि सोहम आवटे असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकाचे नाव आहे. कोमल आवटे या विदेशात गेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या घरी आल्या होत्या. दरम्यान २० एप्रिलला त्या रिगेला सोसायटीमध्ये अकराव्या मजल्यावर वास्तव्यास होत्या. दरम्यान त्यांनी सायंकाळी मुळाशी उडी घेतली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मानसिक आजारातून उचलले पाऊल? 

कोमल आवटेला सिजनोफोबिया हा मानसिक आजार झाला असावा; यातून मला कुणीतरी मारणार आहे. माझ्या मागे भूत लागला आहे असं भास होत होते. यातूनच तिने आपल्या मुलासह आत्महत्या करण्यासारखा टोकाचे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात वाकड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT