पिंपरी चिंचवड : जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या एका टोळक्याने शेतकरी कुटुंबीयाला चक्क बंदुकीचा भाग दाखवला आहे. ही धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासरसाई भागात घडली आहे. या प्रकारचा व्हिडीओ देखील समोर आला असून या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी दहशतीखाली आहेत.
पिंपरी चिंचवडच्या कासारसाई भागात काही शेतकऱ्यांची जमीन आहे. जमिनीवर ऍड. संदीप भोईर हे आपल्या साथीदारांसोबत आले असता त्या ठिकाणी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी संदीप भोईर आणि त्यांच्यासोबत असलेल्या टोळक्याला येण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे संतापलेल्या संदीप भोईर यांनी चक्क आपल्या जवळ असलेल्या बंदुकीने शेतकरी कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवला आहे. यामुळे शेतकरी कुटुंब भयभीत झाले आहे.
दोन्ही बाजूंकडून पोलिसात तक्रार
तर या प्रकरणात आता हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही पक्षाच्या तक्रारी घेण्याचे काम हिंजवडी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने एकूणच पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. संदीप भोईर यांच्याकडे असलेली बंदूक ही परवानाधारक बंदूक होती का? त्याचबरोबर त्यांना अशाप्रकारे बंदुकीचा वापर करून शेतकरी कुटुंबांना धमकावता येऊ शकतं का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
कोपरखैरणे पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई
कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर १ मधील मित्तल टॉवरमध्ये ताज कॅफे नावाचे हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून हुक्का पार्लर मधील हुक्क्याचे साहित्य तसेच तीन गाळे जप्त करून त्याला सील लावले आहे. यामध्ये ताज कॅफे चालक हेमंत पंडित व त्याचा सहकारी नदा झूमानी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.