Bhandara : भावासोबत नहरात आंघोळीसाठी उतरताच घडले दुर्दैवी, आठ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

Bhandara News : अल्ताफ रजा शेख हा त्याचा मोठा भाऊ अहमद व काही मित्रांसोबत शहराच्या बाहेरील तामसवाडी रस्त्याला छेदून गेलेल्या नहरात आंघोळीला गेले होते. सर्वजण नहरातील पाण्यात उतरले होते.
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: घरापासून जवळ असलेल्या नहरात मोठा भाऊ आणि कॉलनीतील मित्रांसोबत पोहण्यासाठी चिमुकला गेला होता, नहरातील पाण्यात उतरताच आठ वर्षीय चिमुकला बुडाला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना तामसवाडी शिवारातील बावनथडी प्रकल्पाच्या नहरात घडली आहे. या घटनेने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.  

भंडाऱ्याच्या तुमसरमधील शिवाजीनगर परिसरातील अल्ताफ शेख (वय ८) असे मृत बालकाचे नाव आहे. अल्ताफ रजा शेख हा त्याचा मोठा भाऊ अहमद व काही मित्रांसोबत शहराच्या बाहेरील तामसवाडी रस्त्याला छेदून गेलेल्या नहरात आंघोळीला गेले होते. सर्वजण नहरातील पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याच्या अंदाज न लागल्याने मोहम्मद हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोहता येत नसल्याने तो खोल भागात गेला आणि काही क्षणांतच पाण्यात बुडून मृत्यू झाला होता..

Bhandara News
Chalisgaon News : शेतजमिनीचा वाद, काकाचा त्रास असह्य; व्हाट्सअँपवर मॅसेज टाकून संपविले जीवन

भावाची वाचविण्यासाठी आरडाओरड 

दरम्यान, लहान भाऊ बुडत असल्याने पाहून त्याच्या मोठ्या भावाने वाचवावाचवा म्हणून आरडाओरड केली. तोपर्यंत अल्ताफ हा नहरातील पाण्यात बुडाला. यावेळी परिसरात कुणीच नसल्याने या बालकांच्या मदतीसाठी कोणीही येऊ शकले नाही. या घटनेने सोबत असलेली सर्व मुले प्रचंड घाबरली होती. भेदरलेल्या अवस्थेत सर्व मुलांनी घराकडे धाव घेत घडल्या घटनेची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी कालव्याकडे धाव घेतली. 

Bhandara News
Swine Flu : नागपुरात कोरोना पाठोपाठ स्वाईन फ्ल्यूने काढले वर तोंड; एका रुग्णाच्या मृत्यूने खळबळ

कुटुंबीयांचा आक्रोश 

परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत काही वेळातच अल्ताफचा मृतदेह कालव्या बाहेर काढला. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com