Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad News : २० लाख किंमतीचा गांजा जप्त; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

Pimpri Chinchwad News : सांगली पोलीस स्टेशन हद्दीतील स्मशानभूमीच्या समोर असलेल्या एसटी कॉलनीच्या ग्राउंडच्या कोपऱ्यावर काही इसम गांजा आणि चरस विक्री करत आहेत. अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : मोकळ्या जागेवर गांजा व चरस विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने कारवाई केली आहे. सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या या कारवाईत जवळपास २० लाख रुपये किमतीचा ७ किलो २०० ग्रॅम गांजा व १७५ ग्राम चरस जप्त केला आहे. (Latest Marathi News)

सांगली पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील स्मशानभूमीच्या समोर असलेल्या एसटी कॉलनीच्या ग्राउंडच्या कोपऱ्यावर काही इसम गांजा आणि चरस विक्री करत आहेत. अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला (Pimpri Chinchwad Police) मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत जवळपास तीन लाख ६० हजार रुपये किमतीचा ७ किलो ३०० ग्रॅम गांजा आणि ४ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचा १७५ ग्रॅम चरस आणि १ लाख ८० हजार रुपये किमतीचा १२ एलएसडी डॉट पेपर, ६ मोबाईल फोन, एक कार, ३ दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५ जणांना घेतले ताब्यात 

या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने ओमकार उर्फ सोन्या महादेव लिंगे, अनिकेत अनिल गोडांबे, रोहन उत्तम कांबळे, रुपेश गौतम जाधव आणि रोहन उर्फ पप्या महादेव लिंगे या पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात सांगवी पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्टच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, वाहनांचं मोठं नुकसान

Marathi Natak: प्रियदर्शन जाधव आणि विशाखा सुभेदारची जोडी पुन्हा कल्ला करणार; शांतेचं कार्टं चालू आहे पुन्हा रंगभूमीवर अवतरणार

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

Crime News: लग्नानंतर पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेताच बसला धक्का; नवरा थेट पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये

Curd And Yogurt: दही आणि योगर्ट मधला फरक काय? उन्हाळ्यात नेमकं काय खावे?

SCROLL FOR NEXT