Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case: आयफोन खरेदीच्या नावाने ५ लाखाचा गंडा

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : आयफोन खरेदी करून देत असल्याचे सांगून एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. ही घटना २५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या  कालावधीत पिंपरी येथे (Pimpri Chinchwad) घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

पिंपरी परिसरात घडलेल्या या फसवणूकीच्या प्रकरणात जगदीश नथुराम आसवाणी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रेहमान अब्दुल जब्बर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना पाच आयफोन खरेदी करून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेतले. 

आयफोन खरेदी केला पण.. 

आरोपीने फिर्यादी यांच्या नावावर आयफोन देखील खरेदी केले. मात्र, त्यांना न पाठवता कुरिअरमध्ये आयफोन गहाळ झाले असे कारण सांगितले. त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस  करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT