Pimpri Chinchwad Corporation Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Corporation : पिंपरी चिंचवड महापालिकेचा अनागोंदी कारभार, पूल ३२ कोटींचा आणि सुशोभीकरणावर २० कोटी

Pimpri Chinchwad : सांगवी ते बोपोडी दरम्यान मुळा नदीवर नवीन पुलाची उभारणी केली जात आहे. सांगवी ते बोपोडी या पुलासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने २०२१ मध्ये एकूण ३२ कोटी ३६ लाख रुपयाच्या कामाला मंजुरी दिली.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत असलेल्या सांगवी येथील मुळा नदीवरील नवीन पुलाची उभारणी केली जात आहे. या पुलासाठी साधारण ३२ कोटी ३६ लाख रुपयांच्या खर्च केला जात आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिका या खर्चातील तब्बल ६० टक्के रक्कम अर्थात जवळपास २० कोटी रुपयांचे सुशोभीकरण काम करण्याचा अजब कारभार केला जात आहे. 

सांगवी ते बोपोडी दरम्यान मुळा नदीवर नवीन पुलाची उभारणी केली जात आहे. सांगवी ते बोपोडी या पुलासाठी (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड महापालिकेने २०२१ मध्ये एकूण ३२ कोटी ३६ लाख रुपयाच्या कामाला मंजुरी दिली. त्यानंतर हा पूल मागील दोन वर्षात उभारण्यात आला. पुलाचे कामही जवळपास पूर्ण होत आले आहे. यावर पिंपरी चिंचवड महापालिका फक्त सुशोभीकरणाच्या नावावर जवळपास २० कोटी रुपये खर्च करत आहे. अर्थात पुलाच्या एकूण किमतीच्या जवळपास ६० ते ६५ टक्के रक्कम पिंपरी- चिंचवड महापालिका फक्त सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च करत आहे. त्यातही १२ कोटी रुपये विद्युतीकरण आणि ७ कोटी रुपये हे सुशोभीकरणावर खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे ह्या मुळा नदीपात्रावरील पुलावर पिंपरी चिंचवड महापालिका सोन्याचे दिवे लावणार आहे का? असा प्रश्न आता पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक उपस्थित करत आहेत. 

पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता त्याच पुलावर सुशोभीकरण्यासाठी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिकेने १९ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्यामुळे एकूणच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनागोंदी कारभारावर आता माजी नगरसेवक प्रश्न उपस्थित करत आहेत. मुळा नदीवरील पूल बांधण्याचे काम आणि पुलाच सुशोभीकरण करण्याचं काम महापालिकेने टी अँड एन टी इन्फ्रा या एकाच कंपनीला दिल्याने महापालिका फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी लोकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी करत आहे; अशी टीका आता पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT