Moshi young man Siddharam Dhale body have been found Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Crime : चार दिवसांपासून नवरा बेपत्ता, बायको अन् कुटुंब शोध घेऊन हैराण, पाचव्या दिवशी खाणीत मृतदेहाचे तुकडे; पुणे हादरलं

Pimpri Chinchwad Murder News : सिद्धाराम ढाले यांची हत्या नेमकी कुणी आणि का केली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हत्या करणाऱ्याच्या मनात सिद्धाराम याच्या मनात इतका द्वेष का होता? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Prashant Patil

पुणे : संपूर्ण राज्यासह पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोसरी भागात असणाऱ्या मोशी येथील गव्हाणे वस्तीमध्ये राहणाऱ्या सिद्धाराम प्रभू ढाले (वय ४५) या बुलडोझर चालकाची हत्या करून त्यांच्या शरीराचे पाच तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिद्धाराम यांचा मृतदेह मोशी येथील कानिफनाथ मंदिरासमोरील खडी मशिन खाणीत आढळून आला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

सिद्धाराम ढाले २९ मार्चला सकाळी कामासाठी घरातून बाहेर गेले होते. रात्री उशीर झाला पण ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ते सापडले नाहीत. अखेर ३१ मार्चला त्यांच्या पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. २ एप्रिलला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मोशीतील खाणीत स्थानिकांना सिद्धाराम यांचे धड आढळले. तिथे त्यांचा मोबाईलही सापडल्यानं ओळख पटली. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांच्या शरीराचे तुकडे केले असून, चेहरा, डोके, डावा पाय आणि दोन्ही हात वेगळे केले होते.

या प्रकरणी सिद्धाराम यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये देखील शीर धडावेगळं करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता मोशी भागात घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सिद्धाराम ढाले यांची हत्या नेमकी कुणी आणि का केली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हत्या करणाऱ्याच्या मनात सिद्धाराम याच्या मनात इतका द्वेष का होता? असा प्रश्न उपस्थित होतोय. या घटनेमागचं गूढ शोधणं हे पोलिसांपुढील मोठं आव्हान आहे. पोलिसांना त्यात यश येतं का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT