Pimpri Chinchwad Hinjewadi Tempo Travels fire case Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Fire News : कटकारस्थान अन् चार निष्पापांचा बळी, ज्यांच्यावर राग होता ते वाचले, अन्...; हिंजवडी बस प्रकरणाचा धक्कादायक उलगडा

Hinjewadi Tempo Travels Fire Incident : ज्या कर्मचाऱ्यांवर जनार्दन हंबर्डीकरचा रोष होता ते तीन कर्मचारी या घटनेत वाचले. ज्या कर्मचाऱ्यांनी जनार्दन हंबर्डीकरला त्रास दिला होता, ते कर्मचारी यात वाचले.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरामध्ये टेम्पो ट्र्रॅव्हलला भीषण आग लागून त्यात चार जण होरपळ्याची घटना घडली होती. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर आली आणि संपूर्ण पुणे हादरलं. त्या ट्र्रॅव्हलला आग शॉर्ट सर्किटमुळे नाही तर चालकानेच आग लावली होती. कंपनीतील कर्मचारी त्रास देत असल्याने त्याने गाडीला आग लावल्याची माहिती आहे. या प्रकरणी ट्र्रॅव्हल चालक जनार्दन हंबर्डीकर (वय ५६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.

या भीषण दुर्घटनेत सुभाष भोसले (वय ४२), शंकर शिंदे (वय ६०), गुरुदास लोकरे (वय ४०), राजू चव्हाण ( वय ४०) (सर्व मृत राहणार पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. जनार्दन हंबर्डीकर हा व्योमा ग्राफिक्स कंपनीत टेम्पो ट्र्रॅव्हल चालवण्याचं काम करायचा. कंपनीकडून दिवाळीत त्याला कमी पगार देण्यात आला होता. तसेच, कंपनीतील कर्मचारी त्याला अपमानास्पद वागणूक देत होते. हे त्याच्या डोक्यात बसलं होतं. त्यामुळे या खुन्नसमध्ये त्याने बदला घेण्याचा निर्णय घेतला.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून त्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने याचा बदला घेण्यासाठी त्याने १२ जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यात इतर कर्मचारी बचावले गेले. चालक जनार्दन हंबर्डीकर याने बेन्झिन केमिकल आणि काही कापडी चिंध्यांचा वापर करत ही ट्रॅव्हल पेटवली. आगीचा भडका उडताच त्याने आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गाडीतून बाहेर उडी घेतली.

मात्र, ज्या कर्मचाऱ्यांवर जनार्दन हंबर्डीकरचा रोष होता ते तीन कर्मचारी या घटनेत वाचले. ज्या कर्मचाऱ्यांनी जनार्दन हंबर्डीकरला त्रास दिला होता, ज्या कर्मचाऱ्यांना त्याला मारायचे होते, ती तीन कर्मचारी या घटनेत वाचले आणि ज्यांचा या प्रकरणाशी तेवढा काही संबंध नव्हता त्यांचा यात नाहक बळी गेला. या घटनेनं चार कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT