पिंपरी चिंचवड : सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रमाण मागील काही दिवसात वाढले आहे. उच्च शिक्षिताना देखील सहजतेने आपल्या जाळ्यात ओढत फसवणूक करत आहेत. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरातील एका आयटीआय अभियंत्याला सायबर गुन्हेगारांनी जवळपास एक कोटी अकरा लाख रुपयाचा आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर गुन्हेगार हे वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. विदेशातून गिफ्ट आल्याचे सांगत तर कधी मनी लॉन्ड्रींगच्या नावाने भीती दाखवत फसवणूक करत आहेत. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार देखील वाढले आहेत. यानुसार अली एक्सप्रेस या शेअर मार्केट गुंतवणूक प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याच्या नावाखाली पिंपरी चिंचवडमधील आयटी अभियंत्याला गंडा घालण्यात आला आहे.
पाच जणांना घेतले ताब्यात
दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येतात आयटी अभियंताने पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल केला. यानंतर, सायबर पोलिसांनी अवघ्या २४ तासात आयटी अभियंताची फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींना नागपूर आणि पुणे शहरातून बेड्या ठोकल्या आहेत. शरद दिलीप सराफवय (वय ४८), सुरज तात्याराम सायकर (वय २८), संकेत संदीप न्हावले (वय २४), नागेश नरसिंगराव गंगे (वय २८) आणि योगीराज किसन जाधव (वय २९) अशी सायबर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहेत.
अशी करायचे फसवणूक
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावावर वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये पैसे गुंतवायला सांगून पैसे हातात आल्यावर यूएसडीटी ही क्रिप्टो करन्सी घेत असत. क्रिप्टो करेंसी घेतल्यानंतर प्लॅटफॉर्मवर विकून त्याचं भारतीय चलनात परिवर्तन करून गुंतवणूकदारांना कोणताही आर्थिक परतावा देत नसल्यास पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.