crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: पत्‍नीच्‍या मित्राला दहाव्‍या मजल्‍यावरून फेकले

पत्‍नीच्‍या मित्राला दहाव्‍या मजल्‍यावरून फेकले

गोपाल मोटघरे

पिंपरी– चिंचवड : पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्या वरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी भोसरी पोलिस (Police) स्टेशन हद्दीत घडली आहे. या घटनेत पत्नीच्या मित्राचा जागीच मृत्यू झालेला आहे. (Tajya Batmya)

निलेश अशोक जोर्वेकर असे मृत्यू झालेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. या घटनेत एमआयडीसी (Bhosari) भोसरी पोलिसांनी पती पंकज शिंदे याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी पंकज शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चरित्रावर (Crime News) संशय ठेऊन होता. दोन दिवसांपूर्वी तो गावाला जात आहे; असं पत्नीला सांगत घराबाहेर पडला. याच दरम्यान पंकजच्या पत्नीला मयत निलेश अशोक जोर्वेकर भेटायला आला. त्या दरम्यान पंकज हा आपल्या पत्नीवर पाळत ठेवून होता. तो एक दिवस अगोदरच गावावरून परतला होता.

दोघात कडाक्‍याचे भांडण

या दरम्‍यान मयत निलेश आणि पंकजची पत्नी दोघे त्याच्या घरात गेले. त्या पाठोपाठ काही मिनिटांनी तिथे पंकज देखील पोहोचला. पत्नी समोरच मयत निलेश आणि पती पंकज यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याच रागातून पंकज याने निलेशला धारदार शस्त्राने भोसकले. या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला. निलेशला धारदार शस्त्राने जखमी केल्यानंतर पंकजने त्‍याला राहत्या घराच्या दहाव्या मजल्यावरील गॅलरीतून खाली ढकलून दिले. ज्यात निलेश जोर्वेकरचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

Maharashtra News Live Update: पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Death News : प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू, अवघ्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT