Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : मंदिरात येत प्रथम दर्शन; महादेवाच्या मंदिरातील चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, पिंपरी चिंचवडमध्ये दोन मंदिरात चोरी

Pimpri Chinchwad News : मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदीचे दर्शन घेण्याच्या बहाण्याने लक्ष ठेवत असल्याचे दिसत आहे. काही वेळानंतर एका चोरट्याने बनावट चावी वापरून दानपेटीतील पैसे घेतले आणि तिघांनीही पळ काढला

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : चोरट्यानी आता आपला मोर्चा मंदिराकडे वळविला असून पिंपरी चिंचवड शहर परिसरात दोन मंदिरात चोरी करण्यात समोर आले आहे. यात चोरटयांनी महादेव मंदिरात आल्यानंतर प्रथम महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिरातील दानपेटी लांबविली आहे. हा संपूर्ण प्रकार मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

चऱ्होली येथील वडमुखवाडी परिसरात मंदिरात शनिवारी दुपारी चोरटे शिरले होते. यातील एक चोरटा महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन दानपेटीतील पैसे काढताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यापूर्वी इतर दोन चोरटे मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदीचे दर्शन घेण्याच्या बहाण्याने लक्ष ठेवत असल्याचे दिसत आहे. काही वेळानंतर यातील एका चोरट्याने बनावट चावी वापरून दानपेटीतील पैसे घेतले आणि तिघांनीही पळ काढला. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. 

हनुमान मंदिरात चोरी

हिंजवडी गावठाण येथील हनुमान मंदिरात चोरी केल्याचे समोर आले आहे. १२ जुलैला रात्री एक वाजता दरम्यान एका अज्ञात चोरट्याने मंदिरातील दानपेटी पळवली आहे. या प्रकरणात ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. मात्र तीन दिवस उलटल्यानंतरही चोरटा पोलिसांच्या हाती न लागल्याने हिंजवडीच्या ग्रामस्थांनी पोलीस तपासा विषयी नाराजी व्यक्त केली आहे.

साई मंदिरातून रोकड लांबविली 
दरम्यान चऱ्होली वडमुख वाडी येथील साई मंदिरात चोरट्यांनी चक्क मंदिराच्या दान पेटीवर डल्ला मारला आहे. दानपेटीतील हजारो रुपये घेऊन चोरटे पसार झाले आहे. हि संपूर्ण चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सध्या दिघी पोलीस या चोरट्यांचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Coach: मुंबई इंडियन्सला मिळला नवीन कोच; 'या' अनुभवी खेळाडूवर संघाची जबाबदारी

Election Commission: मतमोजणीच्या नियमात बदल, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

Farmers in Marathwada: आभाळाचं क्रूर रूप! अतिवृष्टीने पिकं आणि आशा दोन्ही वाहून घेतली,बळीराज्याने फोडला टाहो

SCROLL FOR NEXT