Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime : महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन तोडून पसार; साडेतीन लाखांच्या दागिन्यांसह दोघे ताब्यात

Pimpri Chinchwad News : पोलिसांनी बेड्या ठोकलेले दोन्ही आरोपी हे उत्तर प्रदेश राज्यातील बिजनौ जिल्ह्यातील रहिवासी असून ह्या आरोपींनी पिंपरी चिंचवड शहरातील इतर काही भागातही सोनसाखळी हिसकावून चोरी

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : चैन स्नॅचिंग करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होता. या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी दोन अट्टल आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

हिफाजत आली इनाम अली अन्सारी (वय २४) आणि समीर फिरोज अन्सारी (वय २०) अशी सोनसाखळी हिसकावून चोरी करणाऱ्या चोरट्यांची नाव आहेत. पोलिसांनी बेड्या ठोकलेले दोन्ही आरोपी हे उत्तर प्रदेश राज्यातील बिजनौ जिल्ह्यातील रहिवासी असून ह्या आरोपींनी पिंपरी चिंचवड शहरातील इतर काही भागातही सोनसाखळी हिसकावून चोरी केल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.

साडेतीन लाख रुपयांचे दागिने जप्त 

पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून जवळपास ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच त्यांनी आणखी कोठे अशा प्रकारे सोनसाखळी किंवा अन्य काही चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.  

महावितरणच्या डीपी मधून तांब्याच्या तारेची चोरी...
मावळ
 : मावळच्या आडले गावातील पाझर तलावाजवळ असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज महावितरणच्या डीपी मधील तांब्याचे कॉइल व ऑइल असा एकूण ५५ हजाराचा ऐवज चोरट्याने चोरून पोबारा केला आहे. ३० हजार रुपये किमतीची ६० किलो वजनाची तांब्याची कॉइल तर पंचवीस हजार रुपये किमतीचे ४० लिटर ऑइल असा एकूण ५५ हजार रुपयाचा एवढा चोरून नेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT