Pimpri Chinchwad Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: धक्‍कादायक..मित्रांना सांगून प्रेयसीवर केला प्राणघातक हल्ला

धक्‍कादायक..मित्रांना सांगून प्रेयसीवर केला प्राणघातक हल्ला

गोपाल मोटघरे

Pimpri- Chinchwad : पिंपरी– चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरु प्रियकराने आपल्या काही मित्रांना सुपारी देऊन स्वतःच्याच प्रेयसीवर प्राण घातक (Crime News) हल्ला केला आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांनी एका सार्वजनिक महिला स्वच्छता गृहामध्ये बळजबरीने शिरून प्रियसीवर ब्लेडने सपासप वार केले आहेत. (Pimpri Chinchwad Crime News)

पिंपरी– चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील आकुर्डी रेल्वे लाईन परिसरामध्ये राहणारी एक 27 वर्षाची पीडित तरूणी या हल्‍ल्‍यात अतिशय गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या वायसीएम रुग्णालयामध्ये (Hospital) उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणात पीडितेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी (Police) चेतन या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रियकरा आरोपीला निगडी पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

चेतन आणि पीडित तरुणीचे प्रेम संबंध होते. मात्र, पिडित तरुणी ही गरीब घरातली असल्याने चेतनने तिला लग्नास नकार दिला. मात्र, त्यानंतरही पीडित तरुणी चेतनकडे लग्नाचा आग्रह धरत होती. यामुळे आपल्या काही मित्रांना सुपारी देऊन स्वतःच्याच प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला आहे. हल्‍ला करताना सार्वजनिक महिला स्वच्छता गृहामध्ये ब्‍लेडने वार केले. तसेच अंगावर दारू टाकून आणि डोळ्यांवर तसेच गुप्तांगावर लाल मिरची पावडर टाकून हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे पीडित प्रेयसी आणि तिचे कुटुंब मोठ्या प्रमाणात धास्तावले असून या हल्ल्यातील बाकी फरार हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी पीडितेच्या बहिणींनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : नाशिकनंतर पुण्यात पोलिसांकडून कारवाईचा धडाका; १८ सराईत गुन्हेगार तडीपार, नावे आली समोर

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी–समरची लग्नगाठ बांधली जाणार पण...; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये येणार नवा ट्विस्ट

IPS अधिकारी आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, तपास अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्षांची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार

बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार, पतीने केला पत्नीचा खून; एक मुलगा, दोन मुली पोरकी

SCROLL FOR NEXT