msrtc bus , buldhana , pimpalkhuta mahadev , students
msrtc bus , buldhana , pimpalkhuta mahadev , students saam tv
महाराष्ट्र

बससाठी पाच किलाेमीटर पायपीट करणा-या विद्यार्थ्यांचा तहसीलदारांना घेराव, दिला 'हा' इशारा

संजय जाधव

Buldhana News : शाळेसाठी बसची सुविधा नसल्याने आज पिंपळखुटा महादेव गावातील विद्यार्थी यांनी चक्क तहसिलदारांना घेराव घातला. यावेळी विद्यार्थी (students) यांनी बसची (msrtc bus) सुविधा गावात सुरु झाली नाही तर आम्ही शिक्षण थांबवू असा इशारा देखील प्रशासनास दिला.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा महादेव या गावातील शेकडो विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी दररोज ये जा करीत असतात. या विद्यार्थ्यांना येणे जाणे करण्यासाठी दळणवळणीची व्यवस्था नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दरराेज चार ते पाच किलाेमीटर पायी प्रवास करत विद्यार्थी मुख्य रस्त्यावर गावाच्या फाट्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. या रस्त्यावरून धावणाऱ्या बसेस सुद्धा फाट्यावर थांबत नसल्याने कित्येक वेळ विद्यार्थी ताटकळत राहतात.

यामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी आज चक्क मलकापूरच्या तहसीलदारांना घेराव घातला. यावेळी तहसीलदारांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आमच्या गावात बस सेवा सुरु झाली नाही तर आम्ही आमचं शिक्षण थांबवू. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे दाखले तहसीलदार कार्यालयात अथवा तुमच्याकडे जमा करू असा इशारा दिला.

Edited By: Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Lok Sabha Election 2024 Voting LIVE: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

SCROLL FOR NEXT