गोंदिया विमानतळावर वैमानिकांना आता मिळणार वर्षभर प्रशिक्षण  अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

गोंदिया विमानतळावर वैमानिकांना आता मिळणार वर्षभर प्रशिक्षण

गोंदिया विमानतळावर वैमानिकांना वर्षभर प्रशिक्षण मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या बिरसी येथे असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड़ान अकॅडमीने ही माहिती दिली आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया - गोंदिया विमानतळावर (Gondia Airport) वैमानिकांना (Pilot) वर्षभर प्रशिक्षण मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या बिरसी येथे 14 वर्षांपासून सूरु असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड़ान अकॅडमीने (Indira Gandhi Rashtriya Uran Akademi) ही माहिती दिली आहे. त्यामुळे सहा प्रशिक्षक विमाने असलेल्या ह्या विमानतळावर आता वर्षभर प्रशिक्षण विमानांचा आवाज घोंगावनार आहे. गोंदिया तालुक्यातील बिरसी (birsi) येथील विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र असून या विमानतळावर केवळ हिवाळ्याच्या चार महिनेच पायलट प्रशिक्षण दिले जात होते, मात्र आता या विमानतळावरून वर्षभर पायलटला प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आता नियमित छोटी विमाने उडत असल्याचे दृश्य जिल्हावासीयांना पाहायला मिळणार आहे. (pilot can be trained whole year in gondia airport)

हे देखील पहा -

बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून लवकरच या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढणार असून या परिसरात रोजगाराच्या नवीन संधी सुध्दा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त विमानतळ असल्याने या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे 2007 पासून या विमानतळावर उत्तर प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे प्रशिक्षक पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. पूर्वी बिरसी विमानतळावरून केवळ हिवाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीतच प्रशिक्षण केंद्र सुरू राहत होते. हिवाळ्यात रायबरेली येथे धुक्याची समस्या राहत असल्याने पायलटला प्रशिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळेच या कालावधीत बिरसी येथील विमानतळावर प्रशिक्षण दिले जात होते. मात्र या वर्षीपासून आता बिरसी विमानतळावरूनच वर्षभर पायलटला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे बिरसी विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे.

बिरसी येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे पायलट प्रशिक्षण केंद्र असून आतापर्यंत या पायलट प्रशिक्षण केंद्रातून 200 हून अधिक पायलट प्रशिक्षित झाले आहे. पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी येथे सहा लहान प्रशिक्षक विमाने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अल्पावधीत हे पायलट प्रशिक्षण केंद्र देशात सर्वत्र नावारुपास आले आले असुन आता वर्षभर ह्या ठिकाणी विमाने उडतांना पहायला मिळणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT