amruta fadnavis saam tv
महाराष्ट्र

Rashmi Thackeray: राष्ट्रध्वजाच्या अवमानाची तक्रार हाेताच अमृता फडणवीसांचा फाेटाे व्हायरल

आज दाेन्ही नेत्यांची छायाचित्र व्हायरल हाेताहेत.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : देशाच्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या ध्वजाराेहणा प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी (CMs wife) आणि 'सामना' मुखपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांनी (Rashmi Thackeray) यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. हा आराेप करताना पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे (uddhav thackeray) यांच्या ध्वजाराेहणाचे छायाचित्र समाेर आणलं. दरम्यान पाटील यांच्या आराेपानंतर नेटक-यांनी सन २०१७ काळातील वर्षा बंगला येथील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे एक छायाचित्र समाेर आणलं आहे. या छायाचित्रावरुन सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये समाज माध्यमातून एकमेकांची खेचण्यास (टीका, टिप्पणी) प्रारंभ झाला आहे.

नेटक-यांनी समाेर आणलेले छायाचित्र हे सन २०१७ मधील स्वातंत्र्यदिनाचे आहे. या छायाचित्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ध्वजाराेहणानंतर राष्ट्र ध्वजास मानवंदना देताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) या त्यांच्या कन्येसाेबत उभ्या आहेत. हे छायाचित्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी ट्विट देखील आहे.

रश्मी ठाकरे यांच्याकडे बाेट दाखविणा-यांना त्यावेळी अमृता फडणवीस यांनी त्यावेळी राष्ट्र ध्वजास काेठे सलामी दिली आहे असा प्रश्न नेटकरी विचारु लागले आहेत. एकंदरीतच प्रजासत्ताक दिनाच्या (republic day) दुस-या दिवशी नेटक-यांसह भाजप आणि सेना कार्यकर्त्यांमध्ये छायाचित्रावरुन जुंपल्याचे पहावयास मिळत आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT