Marathi Sahitya Sammelan Saam Tv
महाराष्ट्र

Marathi Sahitya Sammelan: अमळनेर येथील तत्त्वज्ञान केंद्र पुनर्विकास प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde News: अमळनेर येथे शंभर वर्ष जूने तत्त्वज्ञान केंद्र आहे. त्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Marathi Sahitya Sammelan:

अमळनेर येथे शंभर वर्ष जूने तत्त्वज्ञान केंद्र आहे. त्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले आहेत. ते मुंबई येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संमेलनात सहभागी झाले होते. यावेळी संवाद साधतांना मराठी लोक साहित्याच्या संशोधन व ग्रंथ लेखनासाठी विशेष अनुदान देणार असल्याची, माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आज समारोप झाला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दृकश्राव्य ऑनलाईन भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासन महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षणबाह्य शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याबाबत पावले उचलली आहेत.‌ थोर साहित्यिकांच्या, संतांच्या तसेच ज्ञात अज्ञात लोकांनी लिहिलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या जतनासाठी विशेष प्रयत्न करून त्याबाबत प्रस्ताव मागविण्यात येणार आहे.   (Latest Marathi News)

जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती भवन उभे करण्याची संकल्पना आहे. ज्याद्वारे जिल्ह्यातील साहित्याचा, कलेचा प्रचार प्रसाराला एक व्यासपीठ मिळेल. प्रकाशन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथयात्रा अर्थात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

साहित्य संमेलन ही आपली थोर परंपरा आहे. सांस्कृतिक विचारांची ही गंगा अखंड वाहते आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाकडे वाटचाल करतो आहोत. १०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावाजले जाईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते आयोजित केले गेले पाहिजे. महाराष्ट्र शासन १०० व्या साहित्य संमेलनातही सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपल्या समाजात साहित्यिकांचे स्थान हे कायम आदराचे व पूजनीय राहिले आहे. तरूण पिढीतही आता दमदार लिहिणारे लेखक तयार होत आहेत. साहित्य हा महाराष्ट्राचा वैचारिक प्रवाह आहे. केवळ तलवारी घेऊन लढाया करण्यापुरती आपली ओळख मर्यादित नाही. तर लेखणी घेऊन वैचारिकतेचं अधिष्ठान कागदावर मांडणारी अशी ही ओळख आहे. खान्देशात हा साहित्य सोहळा साजरा होत असतांना मराठी भाषेविषयी बोलतांना आपण केवळ प्रमाण भाषेचा विचार करुन चालणार नाही. मराठी भाषेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारी आणि या परिसरातील अहिराणी, तावडी या बोलीभाषा तसेच वऱ्हाडी अन्य अशा आपल्या विविध भागातील बोलीभाषा आपल्या मायमराठीला श्रीमंत करतात हे ध्यानात घ्यावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT