petrol diesel price today Saam TV
महाराष्ट्र

Petrol Diesel Prices : कच्चा तेलाच्या दरात घसरण; पेट्रोल डिझेल झालं स्वस्त, वाचा नवे दर

बुधवारी सकाळी सुद्धा कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली.

Satish Daud

Petrol Diesel Prices : इंधनाचे दर कच्चा तेलाच्या किमतीवर आधारभूत असतात. मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत चढउतार होत आहे. बुधवारी सकाळी सुद्धा कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली. त्याचा परिणाम आज सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही दिसून येत आहे. (Latest Marathi News)

कच्चा तेलाचे दर कमी होताच, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. आज सकाळी उत्तप्रदेशपासून बिहारपर्यंत अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर कमी झाले आहेत. दुसरीकडे दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या माहितीनुसार, उत्तप्रदेशच्या ग्रेटर नोएडा शहरात पेट्रोलची (Petrol) किंमत 16 पैशांनी घसरून 96.60 रुपये प्रति लीटर झाली, तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त होऊन 89.77 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

लखनऊमध्ये पेट्रोल 24 पैशांनी स्वस्त झाले असून ते 96.33 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर  डिझेल (Diesel) 23 पैशांनी घसरून 89.53 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 23 पैशांनी घसरून 107.24 रुपये प्रति लीटर विकले जात आहे, तर डिझेल 21 पैशांनी घसरून 94.04 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या २४ तासांत त्याच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $85.15 वर जवळपास स्थिर आहे. WTI दर देखील प्रति बॅरल $78.63 वर चालू आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT