Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी; 'या' १६ अटी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या प्रांगणात पार पडणाऱ्या बहुचर्चित अश्या सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला असून औरंगाबाद पोलिसांकडून १६ अटींसह त्यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मनसैनिकांत जल्लोष पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणाहून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक भाषणे दिली त्याच ऐतिहासिक अश्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा व्हावी याचा हट्ट मनसैनिकांसह पदाधिकाऱ्यांचा होता. (Raj Thackeray Latest News)

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची घोषणा होताच राज्यभरातल्या विविध संघटनांनी या सभेला जोरदार विरोध दर्शवला होता. प्रामुख्याने शिवसेनेने या सभेस जोरदार विरोध दर्शवल्याचे दिसून आले. राज यांच्या सभेमुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी शक्यता विरोध करणाऱ्या बहुतांश संघटनांची होती. मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर तसेच महाविकास आघाडीवर सडकून केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंविरोधात महाविकास आघाडीकडून जोरदार विरोध आणि टीका सुरु असल्याचे चित्र आहे.

राज ठाकरेंच्या सभेस परवानगी मिळणार कि नाही याबाबत मोठा संभ्रम मनसैनिकांत निर्माण झाला होता. मात्र, कोणत्याही परिस्थितीत या सभेस परवानगी मिळणारच असा विश्वासही मनसे पदाधिकाऱ्यांसह प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला होता. जर परवानगी मिळाली नाही तर प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही मनसैनिकांकडून देण्यात आला होता.

या आहेत अटी शर्ती

१. सदर जाहीर सभा दिनांक ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.

२. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी सभेला येतांना व परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

३. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहरा बाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पाकींगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पाकोग करण्याच्या सुचना द्याव्यात. सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याच प्रमाणे श्री. राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असुन आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून परत जाण्याच्या वेळी कोणतीही रैली काढु नये.

४. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये. पदार्थ बाळगू नये अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अट क्र. २,३,४ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना कळविण्याची जवाबदारी संयोजकांची राहील.

५. ६. सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरुन निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या हो माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक

सिटीचौक यांचे कडे द्यावी.

७. सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा १५००० इतकी असल्यामुळे त्याठिकाणी १५००० पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.

८. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशीत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावं, सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलीसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

९. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरूध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.

१०. सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण व नियमन) नियम २००० नुसार परिशिष्ट नियम ३ (१), ४ (१) अन्वये. आवाजाची मर्यादा असावी. वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये ५ वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु.१,००,०००/- ( एक लाख फक्त) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

११. सदर कार्यक्रमादरम्यान कुटल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवटा, पाणीपुरवटा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

१२. सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालया कडुन काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.

१३. सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.

१४. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.

१५. सदर कार्यक्रमा दरम्यान मिटाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिटाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी,

१६. हा कार्यक्रम सुव्यवस्थीत पणे पार पाडण्यासाठी आपणास घालुन दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरली जाईल याची नोंद घ्यावी. जा.क्र. विशा- ५/आदेश/औ बाद / २०२२-१५७५ औरंगाबाद शहर दिनांक २२/०४/२०२२ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ कलम ३७ (१) (३) अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाला अनुसरून ही परवानगी देण्यात येत आहे. सदर आदेशाची प्रत सोबत जोडलेली आहे. त्याचे पालन करण्यात यावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT