corona 
महाराष्ट्र

काय सांगता? रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास कोरोना काळ योग्यच

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः कोविडचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. आयुर्वेदिक उपचारासह विविध प्रकारचा काढा तसेच मांसाहर सोबतच मद्यपान असेही काहीजण कोरोनातून बरे होण्यासाठी जुगाड सांगतात. व्हॉटस्अॅप युनिर्व्हसिटीतून असे बरेच मेसेज बाहेर आले आहेत. परंतु काही शास्त्रज्ञांनी खरोखराच रामबाण उपाय सूचविले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. फास्टफूटमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. संपूर्ण जग जाणते. ती वाढविण्यासाठी संशोधक डॉ. पंडित विद्यासागर यांनी वेगळे मत मांडले आहे.People's immunity can be boosted during the covid epidemic abn79

आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, सध्याच्या कोरोना आजाराविरुद्ध लढताना योग्य आहार, व्यायाम, विहार व निद्रा यांची गरज आहे. या गोष्टी नियमित केल्या, तर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

पारनेर महाविद्यालयात न्यू ट्रेंड्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आंतरराष्ट्रीय परिसंवादात ‘बदलत्या गुरुत्वाकर्षणाचे जीवसृष्टीवर होणारे परिणाम’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विद्यासागर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते. ते म्हणाले, आजारासह दैनंदिन विविध समस्यांचा सामना करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आपणास मदत करू शकते.

ऑनलाइन संवादात भोपाळ येथील डॉ. नितीन पाटील, पुण्यातील आगरकर अनुसंधान संस्थानचे डॉ. सुरेंद्र घासकडबी, आयआयएसईआरचे डॉ. सत्यजित रथ, मायक्रोबायॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी सहभागी घेऊन विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनात्मक संधीवर मार्गदर्शन केले. People's immunity can be boosted during the covid epidemic abn79

परिसंवादात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील एकूण ४३५ प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधक यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी एकूण १३१ संशोधकांनी आपले संशोधन सादर केले. उत्कृष्ट मौखिक संशोधन सादरीकरण प्रकारातील सर्वसाधारण गटात हैदराबाद येथील डॉ. जयदीप पवार, (प्रथम), चेन्नई येथील डॉ. सचिन अनभुले (द्वितीय) व भेंडे येथील डॉ. भास्कर ताकटे (तृतीय), विद्यार्थी गटात-नगर येथील विजय खंडागळे (प्रथम), पुण्यातील शुभम घुंगार्डे (द्वितीय) व नेवासे येथील अभिषेक निकम (तृतीय) यांची निवड करण्यात आली. परिसंवादात प्राचार्य डॉ. आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे संयोजक प्रा. महेश आहेर यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT