Omraje Nimbalkar faces a crucial political crossroads after the Pavanraje murder case verdict, raising questions over Shinde’s Operation Tiger strategy. saam tv
महाराष्ट्र

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

Omraje Nimbalkar’s Next Move Uncertain After Court Verdict Shock : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला...मात्र या निकालानंतर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलल्याची चर्चा आहे... ठाकरेसेनेचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर नेमकी आता कोणती भूमिका घेणार? एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की फसणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ठाकरेसेनेतील 6 खासदार शिंदेसेनेत पक्षप्रवेश करण्याची चर्चा असतानाच ऑपरेशन

टायगर आता धोक्यात आलयं...आणि त्याला कारण ठरलयं...20 वर्षांनी लागलेला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल....खासदार ओमराजे निंबाळकर पवनराजे हत्याकांडाचा निकाल आपल्या बाजूनं लागावा, यासाठी शिंदेसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा होती... मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर 8 आरोपींची कोर्टाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली... त्यामुळे ओमराजेंचा शिंदेसेनेतील प्रवेश रखडणार असल्याचं बोललं जातयं...त्यातच खुद्द ओमराजेंनीही अद्याप कोणताही राजकीय निर्णय न घेतल्याचं सांगत इतर 5 खासदारांची चिंता वाढवलीय...

दरम्यान पवनराजे हत्याकांडाचा निकाल निंबाळकर कुटुंबियांच्या विरोधात गेल्याचं समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली... तसचं या प्रकरणी सीबीआय कोर्टात अपिल करणार असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदंनी दिलीय.. तर पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात गेल्यामुळे आता ओमराजेंबद्दल निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असं विधान खासदार अनिल देसाईंनी केलीय...

पवनराजे निंबाळकर केसच्या निकालानं ओमराजे निंबाळकरांना वैयक्तिक पातळीवर मोठा धक्का बसला असला, तरी या निकालानं महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरील समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे..

बंडखोर खासदारांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी दोन तृतीयांश संख्याबळ आवश्यक असतं...मात्र त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळत नसल्यानं दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करावं लागतं.. त्यामुळे आता ठाकरेसेनेचे एकूण 9 खासदार असताना त्यातील किमान 6 खासदारांनी फुटून वेगळा गट स्थापन करणं गरजेचं आहे... मात्र ओमराजेंच्या संदिग्ध भूमिकेमुळे एक खासदार कमी झाल्यास 5 खासदारांवर पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत अपात्रतेची कारवाई होऊ शकते...

ठाकरेंशी बंडखोरी करून शिंदेसेनेत सामील होण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या मनात या निकालामुळे धाकधूक वाढली आहे...इकडे आड तिकडे विहीर अशा स्थितीत ओमराजे निंबाळकर अडकल्याचं चिन्ह आहे... त्यामुळे ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय निर्णय घेणार? आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होणार की फसणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, अमित शाहांनी ठाकरेंना डिवचलं

पवनराजेंना कुणी मारलं? पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष

NEETचा गोंधळ संपता संपेना! नागपुरच्या विद्यार्थ्याला दिलं 'अबू धाबी'चं केंद्र

Maharashtra News Live Update: शिर्डीत सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा...

Dombivli News : राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; डोंबिवलीत मनसैनिक आक्रमक, थेट पोलीस ठाण्यावर धडकले

SCROLL FOR NEXT