3 जून 2006 मध्ये मुंबईत कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली होती.तब्बल 20 वर्षांनंतर या हत्याकांडाचा निकाल लागला. मात्र या निकालात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. आठ आरोपींची निर्दाष मुक्तता करतांना न्यायालयानं तपासावर सवाल उपस्थित केलाय.
2003 पासून पद्मसिंह आणि पवनराजे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली. पवनराजेंनी २००३ मध्ये आपल्या जिवाला धोका असल्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. आम्ही १२७ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार झाला. खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर अवलंबून आहे. जैन यांना १५ दिवस मारहाण करुन जबाब घेतला, त्याची औषधं बंद केली, हे अयोग्य आहे. 8 सप्टेंबर 2009ला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेने जैन यांना 25 सप्टेंबरला अटक केली. या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे. सर्वसाधारण साक्षीदार आणि माफीचा साक्षीदार यांच्यात फरक आहे.हे प्रकरण सहजतेने घेतलं म्हणून पद्मसिंह पाटलांसह ८ आरोपींची निर्दाष मुक्तता होते.
या निकालानंतर पद्मसिंह पाटलांच्या वकिलांनी माध्यमांसमोर येत काय दावा केलाय, ते ऐका... जर या खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष आहेत.. मग पवनराजेंना कुणी मारलं, असा सवाल ओमराजे निंबाळकरांनी उपस्थित केलाय...तर दुसरीकडे 17 वर्ष पद्मसिंह पाटलांनी हे आरोप सहन केल्याचं सांगत... त्याची भरपाई कोण करणार, असा सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केलाय...
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पवनराजे निंबाळकरांच्या हत्याकांडाने जी खळबळ माजवली होती, त्याला कारण ठरलं होतं आरोपी पद्मसिंह पाटील यांचं राजकीय वर्चस्व.. यामुळेच आपल्या सख्या चुलत भावाचं वाढतं राजकीय वर्चस्व संपवण्यासाठीच हत्या झाल्याची चर्चा होती... मात्र 20 वर्षांचा तपास... शेकडो साक्षीदार... हजारो पानांचं आरोपपत्र... पोलिस, सीआयडी, सीबीआय चौकशी... तारीख पे तारीख पडूनही आरोपी कोण हेच समोर आलेलं नाही...त्यामुळे जर सर्व आरोपी निर्दोष असतील, तर पवनराजे निंबाळकरांची हत्या नेमकी केली तरी कुणी? हा सवाल उपस्थित होतोय... एकंदरित या निकालानं हा खटला सुटण्याऐवजी नवे प्रश्नच उभे राहिलेत, हे निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.