Patan Assembly Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Patan Assembly Election 2024: शिंदेंचा शिलेदार 'मविआ'ला भारी पडणार? पाटणमध्ये पुन्हा शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजीत पाटणकरांमध्ये सामना; कसं असेल विधानसभेचं गणित?

Patan Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंवर थेट तोफ डागणाऱ्या शंभूराज देसाई यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट आणि महाविकास आघाडी काय रणनिती आखणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कसं असेल पाटण विधानसभा निवडणुकीचे चित्र? वाचा सविस्तर...

Gangappa Pujari

पाटण:

राज्यातील दोन मोठे पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्याचे राजकारण बदलून गेले आहे. त्याची रंगत अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंकडे गेलेल्या गद्दारांना पाडणार अशी गर्जनाच ठाकरे गटाचे नेते करत आहेत.

यामध्ये ठाकरेंच्या रडारवर असलेले महत्वाचे नाव म्हणजे पाटणचे आमदार आणि राज्याचे महसूल मंत्री शंभूराज देसाई. उद्धव ठाकरेंवर थेट तोफ डागणाऱ्या शंभूराज देसाई यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट आणि महाविकास आघाडी काय रणनिती आखणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कसं असेल पाटण विधानसभा निवडणुकीचे चित्र? वाचा सविस्तर...

पाटण विधानसभा मतदार संघ २०२४

पाटण विधानसभा मतदार संघ हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा बालेकिल्ला आहे. सध्या या मतदार संघात त्यांचे नातू शंभूराज देसाई हे नेतृत्व करत आहेत. शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आणि सध्या शरद पवार यांच्या पक्षात असलेले विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजितसिंह पाटणकर यांचेही या मतदार संघात वर्चस्व आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत पुन्हा एकदा मंत्री शंभूराज देसाई यांचे आव्हान असेल.

शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर

याआधी २०१९ मध्ये पाटण विधानसभा मतदार संघात पाटणकर विरुद्ध देसाई अशी दुहेरी लढत झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर यांच्यामध्ये सामना झाला होता. त्यामध्ये शंभूराज देसाई विजयी झाले होते. निवडणुकीत शंभूराज देसाई यांना 1 लाख 6 हजार 266 तर सत्यजीतसिंह पाटणकर यांना 92 हजार 91 मतं मिळाली होती.

कोणाचे पारडे जड?

गेल्या पाच वर्षांपासून शंभूराज देसाई महायुती सरकारमध्ये मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणूनही ते ओळखले जातात. त्यामुळे हातात सत्ता असल्याने विकासकामे अन् जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघावर वचक निर्माण केला आहे. या शंभूराजेंच्या जमेच्या बाजू आहेत.

दुसरीकडे त्यांचे विरोधक असलेल्या राष्ट्रवादीचे सत्यजीतसिंह पाटणकर यांचाही दांडगा जनसंपर्क आणि तालुक्यावर वचक आहे. सत्यजीत यांच्याकडे बाजारसमिती, नगरपरिषदेची सत्ता आहे. याशिवाय दूध संघ, महाविद्यालय यासह नव्याने होत असलेला शुगर केन प्रकल्प या जमेच्या बाजु आहेत.

तसेच या निवडणुकीत शरद पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचीही ताकद त्यांना मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेतही त्यांनी शशिकांत शिंदे यांना मोठे मताधिक्य देत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे पाटणकर यांचेही या निवडणुकीत पारडे जड वाटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT