igatpuri news Saam Tv News
महाराष्ट्र

Railway News: रेल्वेचा भोंगळ कारभार! दीड तास एक्सप्रेस थांबवली; प्रवाशांचा राग अनावर, इगतपुरी स्थानकावर राडा

Passengers protest at Igatpuri station: दीड तासांहून अधिक वेळ एक्सप्रेस थाबंवून ठेवल्यानं प्रवासी संतप्त झाले आहेत. त्यांनी इगतपुरी स्थानकावर राडा घातला आहे.

Bhagyashree Kamble

इगतपुरी स्थानकाजवळ एक गोंधळाचा प्रकार घडला आहे. दीड तासांहून अधिक वेळ एक्सप्रेस थाबंवून ठेवल्यानं प्रवासी संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये जात गोंधळ घातला आहे. या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ही घटना इगतपुरीमध्ये घडली असून, लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्सप्रेसमधील प्रवाशांनी स्टेशनबाहेर गोंधळ घातला आहे.

इगतपुरी स्थानकावर एक्सप्रेसमधील काही संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्सप्रेस इगतपुरी स्थानकावर थांबल्यानं प्रवाशांना राग अनावर झाला. तब्बल दीड तास एक्सप्रेस स्थानकावर थांबली होती. त्यामागून आलेल्या गाड्या सोडल्या जात होत्या. मात्र, एक्सप्रेस दीड तास स्थानकावर थांबून होती.

प्रवाशांना राग अनावर झाला. त्यांनी स्थानकावर उतरून थेट स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये जात गोंधळ घातला. प्रवाशांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. गाडी थांबवून ठेवण्याचे कोणतेही कारण प्रशासनाकडे नसल्याने प्रवासी अधिक संतप्त झाले होते.

संतप्त झालेल्या प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर एक्सप्रेस पावणे दोन तासांनी इगतपुरी स्थानकातून रवाना करण्यात आली. मात्र, पुन्हा स्टेशनच्या पुढे काही अंतरावर पुन्हा थांबवल्याने प्रवासी अधिक संतप्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT