Nashik Saam
महाराष्ट्र

Nashik: मुंबई लोकल अपघातानंतर नाशिकमध्ये थरारक रेल्वे अपघात, एक्सप्रेस पकडताना तरूणाचा हात निसटला, अन् रेल्वेखाली..

Nashik Express News: हरिद्वार एक्सप्रेस पकडण्याच्या घाईत एका प्रवाशाचा हात सटकला आणि तो थेट रेल्वेखाली पडला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.

Bhagyashree Kamble

मुंबई लोकल अपघाताची बातमी ताजी असतानाच, नाशिक रोड रेल्वे स्थानकावर देखील एक धक्कादायक अपघात घडला आहे. हरिद्वार एक्सप्रेस पकडण्याच्या गडबडीत एक प्रवासी रेल्वेखाली पडून गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर देखील एक धक्कादायक अपघात घडला आहे. हरिद्वार एक्सप्रेस पकडण्याच्या गडबडीत एक प्रवासी रेल्वेखाली पडून गंभीर जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रवासी पाण्याची बाटली घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरला होता. कँटिनमध्ये जाऊन त्याने एक पाण्याची बाटली विकत घेतली.

त्याच दरम्यान हरिद्वार एक्सप्रेसने स्थानक सोडले. ट्रेन पकडण्याच्या घाईत त्याचा हात सटकल्याने तो रेल्वेखाली पडला. घटनेनंतर लगेचच रेल्वे अधिकारी आणि स्थानिक परिसरा उपस्थित डॉक्टरांनी तत्काळ मदत केली. जखमी प्रवाशाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांच्या सर्तकतेमुळे त्याचे प्राण वाचले आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे.

मुंबई लोकल अपघातात नेमकं काय घडलं?

मुंब्रा स्थानकाजवळ २ लोकल जवळून गेल्यामुळे काही प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. एक लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. तर, दुसरी कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. या दरम्यान धावती लोकल जवळून गेल्यामुळे फूटबोर्डवर उभे असलेले प्रवासी रेल्वे रूळावर पडले. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित

Monday Horoscope: वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल, ५ राशींच्या आयुष्यात लक्ष्मी प्रवेश करणार; वाचा आजचे राशीभविष्य

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

SCROLL FOR NEXT