Pandharpur Breaking News SAAM TV
महाराष्ट्र

Breaking News : एसटी चालकास चाेपले; प्रवाशावर गुन्हा दाखल

या घटनेमुळे कर्मचारी संतपाले आहेत.

भारत नागणे

पंढरपूर : मंगळवेढा आगारातील एसटी चालकास (bus driver) प्रवाशाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मंगळवेढा आगारातील एसटी कर्मचारी तीव्र नाराज झाले आहेत. संबंधितावर कठाेर कारवाई व्हावी अशी मागणी कर्मचा-यांनी केली आहे. (pandharpur latest marathi news)

सोलापूर (solapur) जिल्ह्यातील नातेपुते जवळील एका हॉटेलवर एसटी बस थांबली असता ही मारहाणीची घटना घडली आहे. फारूक इनामदार असे मारहाण झालेल्या एसटी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर किसन उराडे या प्रवाशाच्या विरोधात नातेपुते (natepute) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याहून (pune) मंगळवेढाकडे (mangalvedha) निघालेली एसटी बस काल रात्री नातेपुते जवळील एका हॉटेलवर थांबली होती गाडी निघण्यास उशीर का केला म्हणून संशयित आरोपी ज्ञानेश्वर उराडे यांनी एसटी चालक फारूक इनामदार यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. याबाबत इनामदार यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली. पाेलीसांनी उराडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT