Mumbai Police: मुंबई पोलीस दलातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. काल मुंबई मॅरेथॉन दरम्यान कर्तव्यावर हजर असलेल्या महिला हवालदाराचे आकस्मीत निधन झाले आहे. अचानक ही घटना घडल्याने पोलिसदलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Mumbai Police News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मॅरेथॉन दरम्यान कांचन भिसे या महिला हवलदार सकाळपासून ड्युटीवर हजर होत्या. काल मुंबई एशियाटिक लायब्ररीजवळ संस्कृती फेस्टिवल २०२३ च्या कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथे कर्तव्यावर हजर अताना अचानक भिसे यांना उचकी लागली आणि त्या खाली पडल्या. यावेळी त्यांना एक रक्ताची उलटी देखील झाली.
सदर घटनेत उपस्थित इतर पोलिसांनी भिसे यांना तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालय गाठण्यास उशिर झाला होता. डॉक्टरांनी भिसे यांना तपासले असता त्यांना मृत घोषीत केले आहे. ड्युटीवर असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे
कुटुंबीयांना सायंकाळी त्यांच्या निधनाची माहिती समजताच मोठा धक्का बसला. कांचन भिसे या मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत कर्तव्यास होत्या. काल मुंबई मॅरेथॉन दरम्यान भिसे कर्तव्यावर हजर होत्या मात्र संध्याकाळी त्यांचं निधन झाल्याने पोलीस दलात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.