Opposition leaders accuse Parth Pawar of massive land scam in Pune; CM Fadnavis orders inquir Saam Tv
महाराष्ट्र

Parth Pawar Pune Land Scam Case: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप

CM Devendra Fadnavis Orders Probe In Parth Pawar: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी पार्थ पवारांवर केलाय... मात्र ही जमीन नेमकी कोणाच्या मालकीची आहे? कोणत्या कंपनीनं ही जमीन खरेदी केली? मुख्यमंत्र्यांनी नेमके काय आदेश दिले?

Suprim Maskar

पुण्यातील मुंढव्यात 43 एकर जमीन खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय...या प्रकरणात अजित पवारांचा मोठा मुलगा पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्युहात अडकलाय.. पार्थ यांच्या अमीडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना विकत घेतल्याचं पुढं आलंय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केलीय.

दरम्यान जमीन खरेदी प्रकरणात नेमका कसा घोटाळा झालाय... काय आरोप करण्यात येतायत..

नेमकं प्रकरण काय?

पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर कोरेगावमधील जमीन खरेदी घोटाळ्याचा आरोप

1800 कोटींची 43 एकर जमीन 300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप

वतनाची जमीन असल्यानं खरेदीआधी शासन दरबारी नजराणा देणे बंधनकारक

21 कोटींची स्टॅम्प ड्युटी असताना केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्पवर जमिनीची खरेदी

पॅरामाऊंट कंपनीनं 273 मूळ मालकांकडून पॉवर ऑफ अॅटर्नी लिहून घेतली

केंद्र आणि राज्याच्या जमिनी सोडवण्याचे अधिकार पॅरामाऊंट कंपनीकडे

मूळ जमीन मालकांना मोबदला देण्याबाबत कागदपत्रात उल्लेख नाही

पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून 2006 मध्ये व्यवहार

2025मध्ये अमेडिया कंपनीकडून जमिनीची खरेदी

दुसरीकडे जागेच्या मूळ मालकानं ती जागा महार वतनाची असल्याचा धक्कादायक खुलासा केलाय.. वतनाची जागा सरकारनं ताब्यात घेतल्याचं आणि पूर्वजांशी एका कंपनीनं पॉवर ऑफ अॅटर्नी केल्याचंही त्यांनी सांगितलयं...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत.. अनियमितता आढळल्यास कडक कारवाई करणार असंही त्यांनी म्हटलंय...

जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर तहसलीदार आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलयं....मात्र या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई होणार होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT