मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुद्ध परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट Saam Tv
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुद्ध परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे, त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने दिला.

विनोद जिरे

बीड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे, त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र (Non bailabl) वॉरंट काढण्याचा आदेश परळी (Parli) न्यायालयाने (court) दिला आहे. 22 ऑक्टोबर 2008 ला राज ठाकरेंना मुंबई (Mumbai) येथे अटक (Arrested) झाली होती. याचे पडसाद परळीत देखील उमटले होते. यादरम्यान मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या, एसटी महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली होती.

हे देखील पहा-

दगडफेकीत बसचे समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. यावेळी जमावबंदी (Curfew) आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, चिथावणीखोर भाष्य केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल गु.रं.नं 208/2008 अन्वये गुन्हा कलम 143, 427, 336, 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

याप्रकरणी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात सतत ते सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश, परळी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एम.एम.मोरे- पावडे यांनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT