Sangli News Saam tv
महाराष्ट्र

चिठ्ठीत लिहिलं, बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहोत...;चिमुकलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी स्वत:ला संपवलं

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात राजेवाडीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : सांगली जिल्ह्यातील (Sangli) आटपाडी तालुक्यात राजेवाडीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. घशात खाऊ पदार्थ अडकल्याने दोन वर्षांच्या (child death) चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेमुळं तिच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला. मुलीच्या मृत्यूचं अतीव दु:ख झाल्याने नैराश्यात गेलेल्या दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलून (Parents ends life) जीवन संपवलं. राजेवाडी येथील कानबुनाथ मंदिराच्या समोर असलेल्या झाडाला गळफास लावून दाम्पत्याने आत्महत्या केली. करण हेगडे (२८) आणि शीतल हेगडे (२२) अशी मृतांची नावं आहेत. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील राजेवाडीती येथील करण हेगडे यांची दोन वर्षाची मुलगी गळ्यामध्ये खाऊ पदार्थ अडकल्याने चार दिवसांपूर्वी मृत पावली होती. या धक्कादायक घटनेमुळं करण हेगडे आणि शीतल हेगडे यांच्यावर मानसिक परिणाम झाला. त्यानंतर करण आणि शीतलने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.

मुलीच्या मृत्यूच्या दु:खामुळे व्यतीत होऊन आम्ही आत्महत्या करत आहोत. बाळा आम्हीं तुझ्याकडे येत आहोत, असं चिठ्ठीत लिहून दोघांना झाडाला फास लावून आत्महत्या केली. आमच्या मृत्यूस आम्ही स्वत: जबाबदार असल्याचेही त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. या घटनेची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वीज पुरवठा खंडित झाल्याने नगरसेवकांंचे झोपून ठिय्या आंदोलन

Nashik : मोठी बातमी! TCSचे ऑफिस बंद, सर्व कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश

Income Tax New Rule: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फॉर्म भरण्याच्या नियमात मोठे बदल

BJP CM: भारतात भाजपचे किती मुख्यमंत्री? एका क्लिकवर वाचा यादी

Chanakya Niti: स्वतःला परफेक्ट बनवण्यासाठी फॉलो करा या 5 सवयी; 7 दिवसात बदलेल आयुष्य

SCROLL FOR NEXT