balloon saam tv
महाराष्ट्र

Balloon Dangers for Kids: पालकांनो सावधान! घशात फुगा अडकून जीव गुदमरला, चिमुकलीचा जीव गेला

Tragic Incident: आता पालकांना सावध करणारी बातमी आहे. फुगा फुगवताना 8 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. धुळ्यातील ही दुर्देवी घटना आहे. पाहूया नेमकं काय घडलंय या रिपोर्टमधून..

Girish Nikam

फुगे फुगवायचे आणि मस्त उडवायचे याचा आनंद मुलांसाठी काही औरच असतो. आजकाल वाढदिवस तर फुग्यांशिवाय साजराच होत नाही. मात्र या फुग्यानं एका चिमुरडीचा आनंद हिरावुन घेतला. तिच्या मृत्यूला कारण ठरलाय. धुळ्यातील ही दुर्दैवी घटना आहे. ही आहे डिंपल वानखेडे...अगदी सुंदर, निष्पाप आठ वर्षांच्या डिंपलचं खेळणे, खोड्या काढण्याचं वय...धुळे शहरातील यशवंत नगर, साक्री रोड येथे वानखेडे कुटुंब राहतं. मात्र एका घटनेनं वानखेडे कुटुंबियांवर दुखाचं डोंगर कोसळला. नेहमी प्रमाणे डिंपल घराच्या अंगणात खेळत होती.ती एक फुगा फुगवत होती. अचानक तो फुटला. या चिमुकलीच्या घशात त्या फुग्याच्या तुकडा अडकला. तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला.

ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

पालकांनी काय काळजी घेतली पाहीजे ते पाहूया...

मुलं खेळत असताना पालकांनी लक्ष ठेवावं

अधूनमधून पालकांनी मुलांची विचारपूस करावी

लहान मुलांना फुगे फुगवायला देऊ नये

फुगे किंवा कोणतेही छोटी खेळणी मुलं तोंडात टाकणार नाहीत याची दक्षता घ्यावी

पालकांना प्राथमिक उपचारांची माहिती असावी

घराजवळचे तज्ञ डॉक्टर, हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक माहित असावा

या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.धुळे शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. मुल खेळत असताना पालकांनी जागृत राहणं गरजेचे आहे. लहानगांच्या हातात फुगा देताना आता सजग राहणं गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्यांनो सावधान! आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

उमेदवारांनो सावध राहा! खबरदारीने निर्णय घ्यावे लागेल; ५ राशींचे लोकांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई महापालिका निवडणुकीत PADU मशिन, आयोगाच्या नव्या मशीनवर ठाकरेंचा आक्षेप, PADU मशीन नेमकं कशासाठी?

SCROLL FOR NEXT