MP Sanjay Jadhav, Uddhav Thackeray Faction Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Faction : ठाकरे गटाच्या खासदारास जीवे मारण्यास ३ कोटींची सुपारी, देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार

या धमकीमुळे परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

राजेश काटकर

MP Sanjay Jadhav : उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील (Uddhav Thackeray Faction) शिवसेनेचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav Latest News) यांनी जीवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार परभणीच्या (Parbhani) जिल्हाधिका-यांसह, पोलिस अधिक्षक तसेच गृहमंत्र्यांकडे केली आहे. खासदार संजय जाधव यांना अशा प्रकारची दुस-यांदा धमकी आल्याने परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

खासदार संजय जाधव यांना दोन दिवसांपूर्वी एका फोनद्वारे माहिती मिळाली हाेती. खबऱ्याने त्यांना आपणांस जीवे मारण्यासाठी ३ कोटी रुपयांची सुपारी देऊ केली असल्याचे खासदार संजय जाधव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.

कुणाच्या व्यवहारात आपला हस्तक्षेप नाही. कुणावर संशय घ्यावा हा प्रश्न असल्याचे खासदार संजय जाधव यांनी नमूद केले. दरम्यान यापूर्वी नांदेड येथील रिंधा गॅंगकडून खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याची तक्रार त्यांनी केली हाेती.

आत्ता आलेल्या धमकीची माहिती व तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे करण्यात आली आहे. याबराेबरच परभणीचे जिल्हाधिकारी आंचल गोयल (anchal goyal), पोलिस अधिक्षक रागुसधा आर. यांच्याकडेही या संदर्भात बोलल्याचे खासदार संजय जाधव यांनी नमूद केले.

दरम्यान खासदार संजय जाधव हे गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेत सक्रीय आहेत. ते सलग दोन वेळा परभणी विधानसभेचे आमदार व नंतर सलग दुसऱ्यांदा परभणी लोकसभेचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याच्या धमकीमुळे परभणी शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोन्याच्या दागिन्यांचा मोह आवरला नाही आणि दोन अल्पवयीन मुलांनी केला 80 वर्षीय वृध्देचा खुन

Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT